ऑनलाईन बेटिंग प्रकरणी ईडीची नजर, अनेक बड्या लोकांची चौकशी होणार...

कोलकत्ता :  भारताचे क्रिक्रेटपटू आणि बॉलिवूड मधील मोठ्या कलाकारांवर अमलबजावणी संचालयाने (ईडी)  कारवाईला सुरवात केली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वीचं माजी क्रिकेटपटू युवराजी सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना, यांची चौकशी केली होती. ऑनलाईन बेटिंग प्रकरणात अभिनेता सोनू सुद, आणि उर्वशी रौतेला यांचीही चौकशी केली...

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बेटिंग अँपवर बंदी घातली होती, परंतू अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्याकडून बंदी घातलेल्या प्लॅटफाॅर्मला का प्रमोट केलं जातं आहे, असा सवाल ईडीने चौकशी दरम्यान केला. या संदर्भात माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकरांवर ईडीची कारवाई केली जात आहे.

अलिकडेच, कोलकत्ता येथे अमलबजावणी संचालयाने मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत एका मोठ्या ऑनलाईन बेटिंग आणि मनी लाँर्डिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी, पश्चिम बंगालसह दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये पसरलेल्या अनेक ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली...

या प्रकरणात 766 बँकेद्वारे पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली . त्यामुळे ईडीने 16 डेबिट आणि क्रेडिट कार्ड लॉक केलेली आहेत. अशी माहिती समोर आली. ईडीने विशाल भारद्वाज आणि सोनू ठाकूर यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची ईडी कोठडीत पाठवले आहे. या कारवाई दरम्यान इडीने 3 कोटी 29 लाख रक्कम जमा केली आहे.

महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीने एप्रिल महिन्यात कारवाई केली होती.  या प्रकरणात  ५१७ कोटी रुपयांची मालमत्ता इडीने जप्त केली...

 
Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या