Crude Price: इस्त्राईल व इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात 'तुफानी' 'ही' कारणे जबाबदार !

प्रतिनिधी: कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दुपारपर्यंत तुफानी आली आहे. इस्त्राईल व इराण युद्धाचे पडसाद उमटले असताना आता प्रति बॅरेल किंमत महागली आहे. जागतिक बाजारपेठेत तेल महागले असतानाच भारताच्या एमसीएक्स (MC X) बाजारात कच्च्या (Crude Oil) दुपारपर्यंत मोठी वाढ झाली आहे. दुपारपर्यंत निर्देशांकात ०.८३% वाढ झाली असून प्रति बॅरेल पातळी ६०९८.०० रूपयांवर पोहोचली आहे.


जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या WTI Futures तेल निर्देशांकात दुपारपर्यंत १.५८% वाढ झाल्याने तेलाची महागाई टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १.५८% टक्के वाढ झाल्याने प्रति बॅरेल किंमत ७१.३९ डॉलरवर पोहो च ली आहे. Brent Future निर्देशांकात १.५८% वाढ झाल्याने कच्च्या तेलाची पातळी ७४.४५ डॉलरवर पोहोचली आहे.


जवळपास २% वाढ झाल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यपूर्वेकडील युद्धाने बाजारातील तेलाच्या मागणीत वाढ व पुरवठ्यात घट झाल्याने ही वाढ प्रामुख्याने होत आहे. निफ्टी तेल व गॅस निर्देशांक (Nifty Oil and Gas Index) यामध्ये दुपारी ०.८७% घसरण झाली आहे. सकाळी मात्र भाववाढ सुरु होताना सकाळच्या सत्रात तेलाच्या समभागात वाढ झाली होती. बीपीसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या समभागात (Sha res) मध्ये वाढ झाली होती. मात्र सत्राच्या अखेरीस या समभागात घसरण झाली आहे.


शुक्रवारी अमेरिकन बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत ३% घट झाल्याने मध्यपूर्वेतील दबाव कमी होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र सोमवारी या इस्त्राईल व इराण संघर्षाने नवे वळण घेतल्याने या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.


तज्ञांच्या मते, सध्या तरी वॉल स्ट्रीटला असा अंदाज आहे की संघर्ष मर्यादित राहील. परंतु कोणतीही नवीन लष्करी कारवाई किंवा पुरवठा खंडित झाल्यामुळे अधिक अस्थिरता येऊ शकते. गुंतवणूकदारांनी तेलाच्या किमती, मध्य पूर्वेतील बातम्या आणि या आठवड्यातील फेडच्या टिप्पण्यांवर लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून बाजार पुढे कुठे जाऊ शकतो याचे संकेत मिळतील.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले आहे की, तेल अवीव आणि तेहरान यांच्यात युद्धबंदीच्या योजनेपेक्षा 'खूप मोठ्या' गोष्टींमुळे ग्रुप ऑफ सेव्हन शिखर परिषदेतून त्यांचे लवकर निघून जाणे आवश्यक होते, त्यांनी लोकांना "तात्काळ तेहरान सोडण्याचे" आवाहन केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 भेटीनंतर माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली होती. याचा आणखी परिणाम तेलाच्या पुरवठ्यात होण्याची शक्यता आहे. या विधानासह चालू असलेल्या क्षेपणास्त्रांच्या देवाणघेवाणी, तेहरानमध्ये जोरदार हवाई संरक्षण गोळीबार आणि तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याच्या सायरनमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे याची परिणती म्हणून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम