Aai Bhadyane Havi Marathi Movie : बाप-लेकीची जोडी पुन्हा सज्ज! केदार शिंदेंचा नवा धमाका; 'आई भाड्याने हवी?' चित्रपटाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीला 'बाईपण भारी देवा' आणि 'अगंबाई...अरेच्चा!' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर 'प्रहार' करायला सज्ज झाले आहेत. नेहमीच स्त्रीप्रधान आणि कौटुंबिक विषयांना आपल्या खास शैलीत मांडणाऱ्या केदार शिंदेंनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले असून, संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची चर्चा रंगली आहे. ‘आई भाड्याने हवी?’ असे या चित्रपटाचे नाव असून, यातील ‘भाड्याने’ या शब्दाने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आणि उत्सुकता निर्माण केली आहे. नात्यांमधील ओलावा आणि सामाजिक विषयांची उत्तम सांगड घालणारे शिंदे यावेळी पडद्यावर नक्की काय नवीन मांडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.



सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाही आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं आहे, तर या चित्रपटाचं छायांकन आणि संकलनाची जबाबदारी मयूर संजीवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक आणि लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही यशस्वी टीम पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

'आई भाड्याने हवी?' मधून उलगडणार नात्यांमधील भावनिक गुंता


केदार शिंदे यांच्या मते, जोपर्यंत कथा काळजाला भिडत नाही, तोपर्यंत ती पडद्यावर आणण्यात अर्थ नाही. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांची झलक अनुभवायला मिळेल. म्हणजेच, पोट धरून हसवतानाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणेल आणि एक अत्यंत प्रभावी सामाजिक संदेश देऊन जाईल. ‘आई’ या नात्यातील मायेचा ओलावा आणि सध्याच्या पिढीतील या नात्याची उणीव यावर हा चित्रपट भाष्य करेल. चित्रपटाची निर्माती सना शिंदे हिने या चित्रपटाबद्दल मोठी माहिती दिली आहे. हा एक 'मल्टीस्टारर' चित्रपट असून, यात मनोरंजनासोबतच भावना आणि विनोदाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल. आधुनिक जीवनशैलीत माणसांमधील संवाद हरवत चालला आहे आणि अशा परिस्थितीत एका 'आई'ची गरज कशी भासते, हे या वेगळ्या शीर्षकातून अधोरेखित करण्यात आलं आहे. सध्या या बिग बजेट चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, विविध वयोगटातील 'आई'च्या भूमिकांसाठी मोठे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जून-जुलै महिन्यापासून सुरुवात होणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या ऐतिहासिक यशानंतर केदार शिंदे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचणार का? याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे डोळे लागले आहेत.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट