Block Deal Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे पाऊल एशियन पेंटसमधून काढली १८७६ कोटींची गुंतवणूक

प्रतिनिधी: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) कंपनीने एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीतील आपले ०.४९% म्हणजेच ८५ लाख समभाग (Shares) ब्लॉक डील (Block Deal) मधून विकले आहेत. कंप नीने १८७६ कोटी रूपये मूल्यांकन (Valuation) असलेल्या समभागांची विक्री केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आस्थापना (Entity) असलेल्या सिद्धार्थ कर्मशिअलने ही विक्री केली आहे. कंपनीच्या एकूण ०.९ इक्विटी असलेल्या या समभा गाचे भागभांडवल ICICI Prudential Mutual Fund कंपनीने खरेदी केले आहेत.


प्री शेअर (Pre Share Price) २२०७ रूपये प्रति शेअर्सवर हे ब्लॉक डील झाले आहे. सोमवारच्या शेअर बाजार सत्रानंतर एशियन पेंट्सचे शेअर्स १.२८ टक्क्यांनी वाढून २,२४३.६५ रूपयांवर पोहोचला होता. हा समभाग मागील बाजार बंदच्या वेळी २,२१५.३० रुपये पातळीवर पोहोचला होता. काल शेअर बाजार सत्रादरम्यान अधिकृत डेटापूर्वी ब्लॉक डीलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनंतर कंपनीचे शेअर्स वधारले आहेत. गेल्या एक वर्षात कंपनीच्या समभागात २३.२१ टक्क्याने घसरण झाली होती. तर काल एशियन पेंटसचा समभाग ३३९४ रूपये पातळी घालू शकला होता. बाजारातील माहितीनुसार, कंपनीने एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २.१५ लाख कोटी रुपये आहे. आज दुपारपर्यंत कंपनीच्या समभागात ०.९०% वाढ झाल्याने कंपनीचा समभाग २२६५ रूपयांनी बाजारात विकला जात आहे.


यापूर्वी कंपनीने ब्लॉकडील बदल एक्सचेंजला कळवताना, 'कृपया लक्षात घ्या की सिद्धांत कमर्शियल्स लिमिटेड मार्फत रिलायन्स इंडस्ट्रीजकडे असलेले एशियन पेंट्सचे ३.५ कोटी इक्विटी शेअर्स आज २,२०१ रुपये प्रति शेअर या किमतीला विकले गेले आहेत, ज्यामुळे एशियन पेंट्सचे ८७ लाख इक्विटी शेअर्स शिल्लक आहेत," असे आरआयएलने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे