वृद्ध वडिलांनी मुलाला आणि सैन्यात असलेल्या पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप, दोन वैमानिक अनंतात विलीन

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त 11A या आसनावरील प्रवासी वाचला. काही दिवसांच्या अंतराने उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दिशेने भाविकांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. या दोन दुर्घटनांमुळे भारताने दोन गुणी वैमानिक (पायलट) गमावले. दोन्ही वैमानिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





मुंबईत एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना त्यांच्या वृद्ध वडिलांनी पुष्करराज यांनी पवईच्या घरी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्या वयात मुलाचा आधार घेऊन जगावे असे वाटते त्या वयात मुलाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ पुष्करराज यांच्यावर आली. बराच वेळ पुष्करराज हात जोडून शांत उभे होते. अखेर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. ते रडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. मुंबईत असे शोकाकूल वातावरण असताना जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान त्यांचे पती, लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान (निवृत्त) यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत होत्या. राजवीर सिंग हे १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे पायलट होते.

मुंबईत झाले अंत्यसंस्कार

कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कुटुंबीयांनी कॅप्टन सभरवाल यांचे पार्थिव पवई येथील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यांचे पार्थिव तासभर घरी ठेवण्यात आले नंतर चकाला येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुळ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी लेफ्टनंट कर्नलवर येऊन पडली

रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यात १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आणि विविध भूप्रदेशांमध्ये उड्डाण मोहिमांचा त्यांना व्यापक अनुभव होता. रविवारी केदारनाथजवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आणि पायलट चौहानसह सात जणांचा मृत्यू झाला. आता राजवीर यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्यावर एकटीने जुळ्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. चारच महिन्यांपूर्वी चौहान दांपत्याला जुळी मुले झाली होती.

 
Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर