बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनवणी पुढे ढकलली? 

बीड : बीड जिल्हातील संतोष देशमुख हत्याप्रकरणतील (santosh deshmukh murder case)  सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मकोका न्यायालयातील न्यायधीश सुट्टीवर असल्याने सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सुनावणी 17  जून रोजी होणार होती. वाल्मिक कराडच्या आरोपांवरती नेमका काय युक्तिवाद होणार आहे. याकडे संपूर्ण बीड रहिवाशांचं लक्ष लागून होते.  न्यायालयाचे न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे युक्तिवाद पुढे ढकलण्यात आला आहे.

बीडच्या (beed) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.  वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.  परंतू कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. गेल्या सुनावणीमध्ये उज्वल निकम यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता, त्या अर्जात आरोपी विरोद्धात आरोप सिद्ध करण्यात यावेत अशी मागणी निकम यांनी न्यायालयात केली होती.

तर वाल्मीक कराडच्या वकीलांकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आले,  वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे.  संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनावणी मागील 3 जून रोजी झाली होती. मागच्या सुनावणीसाठी वकील उज्वल निकम उपस्थित राहून आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद केला होता. आरोपीच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स प्राप्त व्हावेत यासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली होती .याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती .मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या