मनपा कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून सुद्धा अनेक शासकीय, महापालिका कार्यालयात वीज वाया घालण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे.


वीजेची बचत करणे अधिकाऱ्यांची जबाबदार आहे; परंतु काही अधिकाऱ्यांकडून विजेची बचत होताना दिसत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. भांडुप (प.) येथील मनपा एस विभागातील रस्ते विभागाचे रस्ते अभियंता कल्पना मेस्त्री (कोतवाल), अलंकार वीर, सुशांत पाटील या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सदर संबंधित अधिकारी जागेवर नसताना सुद्धा लाईट, पंखा चालू असल्याचे समोर आले असून येणाऱ्या आगावू वीज बिलाचा भुर्दंड पालिकेला सोसावा लागत आहे.


कामानिमित्त व इतर ठिकाणी जाण्यापूर्वी लाईट, पंखा बंद करुन विजेची बचत करायची सोडून, वीज वाया घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वराडे यांनी मनपा एस विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण