ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
Stock Market Update: सकाळी सेन्सेक्स १८४.७८ व निफ्टी ६६.५५ अंशाने उसळला बँक निफ्टीत दबाव कायम !
June 16, 2025 10:06 AM
प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क सकाळी वाढ झाली आहे. बाजारात सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) १८४.७८ अंशाने उसळला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) ने ६६.५५ अंशाने उसळला आहे. सेन्से क्स ८१३०३.३८ व निफ्टी २४७७६.३५ पातळीवर पोहोचली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३१.५५ अंशाने घसरण होत निर्देशांक ६२५३८.८९ पातळीवर व बँक निफ्टी ६९.१५ अंशाने घसरत ५५४२८.२५ पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स मिडकॅप (Midcap) व स्मॉलकॅप (Smallcap) मध्ये अनुक्रमे ०.६२ व १.३० टक्क्याने घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण झाली. मिडकॅप ०.५२ व स्मॉलकॅप ०.९७% घसरला आहे.
आज बाजारातील सेन्सेक्स व निफ्टीची पातळी वाढली असली तरी बँक निर्देशांकात गेल्या आठवड्यातील घसरण कायम राहिली आहे. बाजारातील दबावाची पातळी विशेषतः बँक निर्देशांकात दिसून येते. एकूण बाजारातील निर्देशांकात तेजी दिसली तरी मात्र बँकेशिवाय मिडकॅप व स्मॉलकॅपवरचा दबाव जाणवत आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये केवळ एफएमसीजी (०.०२%), आयटी (०.३५%) निर्देशांकात वाढ झाली आहे बाकी सगळ्या निर्देशांकात सकाळी घसरण कायम राहिली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.९७%), मिडिया (०.७२%), रिअल्टी (०.७३%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (०.८१%) समभागात (Shares) मध्ये घसरण झाली आहे.
काल इस्त्राईलने पुन्हा इराकवर क्षेपणास्त्र डागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थविश्वात दबावाचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात सतत वाढ होत असताना त्याचा फटका आशियाई बाजारा त बसला आहे. गेल्या तीन दिवसात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) विशेषतः शुक्रवारी १५१९६.६१ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतल्यावर बाजारातील सपोर्ट लेवलला फटका बसला हो ता. मात्र घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) ने २९०६.१३ कोटींची अधिकची गुंतवणूक केल्याने निफ्टीची पातळी मर्यादित राहिली.
याशिवाय या आठवड्यात भारतातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) चे दर येणे अपेक्षित असल्याने बाजारात काही प्रमाणात तेजीचे वातावरण असू शकते. मात्र मिडकॅप व स्मॉलकॅपवरचा दबाव बँक व फायनांशियल सर्विसेस समभागात दिसून आल्याने त्यांची परिणती कशी होते ते अखेरच्या सत्रात कळू शकेल.
सकाळच्या सत्रात नावा (६.७९%), पीआय इंडस्ट्रीज (३.४७%), ग्लॅन्ड फार्मा (२.२७%), एससीआय (२.१७%), एचबीएल इंजिनियरिंग (१.८९%), केईसी इंटरनॅशनल (१.७९%), सिप्ला (१.५४%),पॉवर ग्रीड (१.४६%), भारती एअरटेल (१.० ५%), अल्ट्राटेक सिमेंट (०.९३%), श्रीराम फायनान्स (०.७९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.७०%) समभागात वाढ झाली आहे.
इंटलेक डिझाईन (३.९४%), किर्लोस्कर ऑईल (३.६२%), टाटा टेलि कम्युनिकेशन (३.५६%), जेएम फायनांशियल (३.२४%), एमएमटीसी (३.०९%), आयएफसीआय (२.९२%), अलोक इंडस्ट्रीज (२.८७%), टाटा मोटर्स (४.७९%), बजाज होर्डिंग्ज (२.६४%), अदानी पॉवर (२.२४%), अदानी ग्रीन एनर्जी (१.८१%), आयआरएफसी (१.३५%) या समभागात घसरण झाली आहे.
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक
July 21, 2026 06:18 PM
Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या
ताज्या घडामोडीLifestyle
July 21, 2026 03:54 PM
तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक
July 20, 2026 07:04 PM
Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम
July 20, 2026 05:19 PM
Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई
ताज्या घडामोडीLifestyle
July 20, 2026 03:10 PM
तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश
ताज्या घडामोडीLifestyle
July 20, 2026 03:01 PM
बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt)
https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/
ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट