अरे बापरे! बुलढाण्यात नवीन आजार! केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना पडताहेत भेगा?

  76

बुलढाणा : बुलढाणा हा जिल्हा काही दिवसांपूर्वी अजब आजारांमुळे चर्चेचा विषय बनला होता. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात लोकांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळत होते. त्यानंतर नख गळतीचा अजब प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता येथील नागरिकांच्या हातांना भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आहे.



आरोग्य विभागाने केली तपासणी


मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावातील नागरिकांच्या हातांना भेगा पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत. ही बाब समोर येताच आरोग्य पथक शेलगाव देशमुख या गावात दाखल झाले आहे. या पथकाकडून २० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अनेकांवर सध्या उपचार चालू आहेत. सतत वेगवेगळे आजाराचे गंभीर प्रकार उजेडात येत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.


आरोग्य विभागाकडून तातडीने उपचार सुरू


विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गावात हा प्रकार घडला आहे. आरोग्य पथकाकडून रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहे. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही. विविध प्रकारचे प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टर सांगतात.


दरम्यान, सर्व रूग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज