Kedarnath Bhim Shila : केदारनाथचा चमत्कार : भीम शिलेचं रहस्य!

२०१३चा जलप्रलय : केदारनाथला कुणी वाचवलं?


१६ जून २०१३... उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयाने सर्वत्र हाहाकार माजवला होता, मात्र या महाभयंकर जलप्रलयात केदारनाथ मंदिराला एका शिलेनं वाचवलं. ही एक रहस्यमय ठरलेली भीम शिला आजही चर्चेचा विषय ठरतेय. आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, कसा झाला हा चमत्कार आणि काय आहे या शिलेचं रहस्य!

?si=RSEnIAAztwi0FaA2

 

जून २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये पावसामुळे महाभयंकर जलप्रलय आला होता. हा महाभंयकर जलप्रलय म्हणजे भारतातील सर्वात भयानक नैसर्गिक संकट होतं. प्रचंड पावसामुळे केदारनाथ पर्वतावरील मंदिरापासून अवघ्या ५ किलोमीटरवर असलेला चोराबारी ग्लेशियरजवळील तलाव फुटला. या जलप्रलयामुळे केदारनाथ मंदिराच्या परिसरात पूर आला आणि हाहाकार माजला. ६ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला तर ३ हजारांहून अधिक आजही बेपत्ता आहेत. १६ जूनची संध्याकाळ. अशीही एक कऱ्हाळ संध्याकाळ कुणी स्वप्नातही पाहिली नसेल. केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह येत असल्याचं पर्यटकांनी पाहिलं आणि त्यांच्या भीतीने गाळण उडाली. पायाखालची जमीनच सरकली. घाबरलेल्या पर्यटकांनी मंदिराचा आश्रय घेतला. हा जलप्रलय इतका भयंकर होता की कोणतीही गोष्ट त्यापुढे टिकू शकेल असं वाटत नव्हतं, असं मत अनेक साधू आणि स्थानिकांनी व्यक्त केलं. मात्र या जलप्रलयात एक चमत्कार घडला. प्रचंड अशा जलप्रवाहासाबोत मंदिराच्या मागील डोंगरावरून एक प्रचंड मोठी शिला खाली आली. ही शिला मंदिरावर आदळेल आणि होत्याचं नव्हतं होईल, असं सर्वांना वाटलं, मात्र काही क्षणातच चमत्कार झाला.



पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत अलेली ही भली मोठी शिला मंदिरापासून अवघ्या ५० फूट अंतरावर थांबली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह दोन भागांत विभागला आणि मंदिराच्या दोन्ही बाजूंनी प्रवाह वाहू लागला. त्या रात्री मंदिरात ३०० ते ५०० जणांनी आश्रय घेतला होता. शिला मंदिराकडे येताना पाहून लोकांनी भोलेनाथ आणि केदारबाबांचा जप सुरू केला. ही भली मोठी शिला मंदिरापासून काही अंतरावर थांबणं आणि प्रवाह विभाजीत होणं हा भोलेनाथांचा आशीर्वादच होता, असं स्थानिक, पर्यटक आणि काही साधूंचं म्हणणं आहे. आज या शिलेला भीम शिला म्हणून ओळखलं जातं आणि तिची पूजा केली जाते. कारण या शिलेमुळे अनेकांचे प्राण वाचले होते. ही शिला कुठून आली आणि मंदिराच्या मागे का थांबली, हे आजही रहस्य आहे. काहींच्या मते, हा भोलेनाथांचा चमत्कार आहे, तर काहींना वाटते की आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या आशीर्वादाने मंदिर वाचलं.

भारतीय पुरातत्व विभागही या शिलेच्या मूळ स्थानाबद्दल अनभिज्ञ आहे. ही शिला आजही केदारनाथ मंदिराच्या मागे उभी आहे, जणू ती मंदिराचं आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांचं रक्षण करत आहे. या भीम शिलेची कहाणी केदारनाथच्या श्रद्धेचा आणि चमत्काराचा एक अनमोल ठेवा आहे. जलप्रलयात मंदिर आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या शिलेबाबत आजही भक्तांच्या मनात श्रद्धेचं स्थान आहे.
Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२

जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर

टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा नियमावलीच्या छताखाली

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲप आधारित वाहतूक सेवेबाबतचे धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असून या