Lucknow Airport Accident : लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला; विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या

सौदीच्या विमानातील २८२ हजयात्री सुरक्षित


लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे मोठी विमान दुर्घटना टळली. सौदी एअरलाईन्सचे विमान लँड झाल्यानंतर विमानाच्या चाकातून ठिणग्या आणि धूर निघू लागला. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत एटीसीला माहिती दिली आणि संभाव्य अपघात टळला. या विमानातील जेद्दाहहून येणारे २८२ हज यात्रेकरू सुरक्षित आहेत.



चाकातून धूर आणि ठिणग्या


मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान (एसव्ही-३८५२) शनिवारी रात्री जेद्दा विमानतळावरून लखनऊसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज यात्रेकरू प्रवास करत होते. हे विमान रविवारी सकाळी ६.३० वाजता अमौसी विमानतळावर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याची सूचना दिली.





सर्व प्रवाशी सुखरूप 


घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने फोम आणि पाण्याचा मारा करून केवळ २० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाला पुश बॅक करून टॅक्सी-वेवर आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.



हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज


प्रवाशांना सुखरूप उतरवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने विमानाच्या चाकातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यानच डाव्या बाजूच्या चाकात बिघाड झाला होता. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या होत्या. विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि अभियंत्यांचे पथक तो दुरुस्त करत आहे. विमानातील बिघाड दुरुस्त होताच ते जेद्दासाठी रवाना केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू