Mangala Bhatt Passes Away: कथक नृत्यांगना मंगला भट्ट यांचे निधन, होते मराठी कनेक्शन

हैद्राबाद: संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त कथक नृत्यांगना मंगला भट्ट (Mangala Bhatt Passes Away) यांचे सोमवार, १६ जून रोजी हैदराबाद येथे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पती राघव राज भट्ट आणि मुलगा माधव असा परिवार आहे. त्या मुळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेकांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले.



पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी


पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी यांनी दिल्ली कथक केंद्रामध्ये पंडित दुर्गालालजी यांच्याकडून कथकचे धडे घेतले. मंगलाताईंनी देश-विदेशात अनेक महोत्सवांमध्ये आपल्या कथक नृत्यप्रतिभेचा अविष्कार सादर केला. प्रतिभावंत नृत्यांगना म्हणून त्यांचा नावलौकिक होता. हैदराबाद येथील त्यांच्या आकृती कथक केंद्रासोबतच वेळोवेळी परदेशात राहून कथकच्या प्रशिक्षणाचे तसेच प्रचार- प्रसाराचे कार्य केले.


केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारासोबतच तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. मंगलाताई कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी गेली काही वर्षे गार्गीदेवी निंबाळकर यांच्या माध्यमातून कथकचे प्रशिक्षण देत होत्या. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राघवराज भट्ट हे त्यांचे पती आहेत.


"देशभरातील शास्त्रीय नृत्य कलाकारांसाठी हा एक अत्यंत दुःखद दिवस आहे. नेहमीच हसतमुख असणाऱ्या मंगलाजी, गेल्या काही महिन्यांत एका दुर्मिळ आजाराचा सामना करत होत्या. अलिकडेच दोन आठवड्यांपूर्वी, त्या स्पिक मॅकेसाठी एका नृत्य कार्यशाळेत मग्न होत्या," असे नृत्यांगना आनंद शंकर जयंत यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. तर सुप्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आणि कार्यकर्त्या चंदना चक्रवर्ती यांनी मंगला यांच्या निधनाचे शोक व्यक्त करताना लिहिले, "धक्कादायक, अविश्वसनीय आणि अत्यंत दुःखद बातमी. कथक नृत्यांगना आणि माझी  प्रिय मैत्रीण, मंगला भट्ट, खूप लवकर आपल्यामधून गेल्या. ”

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं