Sonam Raghuvanshi: युट्यूबर्सच्या व्हिडिओत दिसले सोनम आणि राजा, डोंगर चढताना योगायोगाने कॅमेऱ्यात झाले कैद

  158

नवी दिल्ली: हनिमूनसाठी मेघालयात गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचा एक नवीन व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) अगदी स्वच्छ समोरून येताना दिसतात, राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणात हा व्हिडिओ एक जबरदस्त पुरावा ठरू शकतो. मेघालय फिरायला गेलेल्या देवसिंग या  ट्रॅवल व्लॉगरच्या कॅमेऱ्यात सोनम आणि राजा दिसून आले आहेत. त्यात सोनम पुढे, तर राजा पाठीमागून चालताना दिसत आहे.


सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा हा व्हिडीओ मेघालयात फिरत असतानाचा आहे. देवसिंगदेखील त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी मेघालयमध्ये भटकंती करत असताना, व्हिडिओ बनवत होता. त्यादरम्यान योगायोगाने सोनम आणि राजा त्याच्या समोरून गेले, आणि त्यामुळे ते देखील या व्हिडिओत शूट झाले. त्यात सोनमच्या हातात एक काठी दिसून येते. तर मागून राजा खांद्यावर जॅकेट आणि क्रॉस बॅग घेऊन जाताना दिसून येतो. या व्हिडिओनंतरच राजाची निर्घुण हत्या केल्याचा अंदाज आहे. कारण घटनास्थळी राजाच्या मृतदेहाशेजारी राजाने हेच कपडे आणि जॅकेट परिधान केले होते.



हाच तो व्हिडिओ




सोनम आणि राजाचा हा व्हिडीओ कुठला?


देवसिंगने त्याच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या सोनम आणि राजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहताना त्याला हे जोडपं दिसलं, आणि त्याला धक्काच बसला.  "२३ मे रोजी मी मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर जाताना एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. काल मी तो व्हिडीओ बघत होतो आणि मला इंदूरचे हे जोडपं शूट झाल्याचे दिसले. ती सकाळची ९.४५ वाजेदरम्यानची वेळ होती. आम्ही खाली उतरत होतो तर  नोगरिएट गावात मुक्काम केल्यानंतर हे जोडप वर जात होतं." अशी माहिती त्याने या व्हिडिओ पोस्ट खाली दिली आहे.


देवसिंगने या पोस्ट खाली असेही म्हटले आहे की, 'मला वाटतं की हा या जोडप्याचा शेवटचा व्हिडीओ आहे. सोनमने तोच पांढरा टी शर्ट घातलेला दिसत आहे, जो राजाच्या मृतदेहाजवळ सापडला. मला आशा आहे की हा व्हिडीओमुळे मेघालय पोलिसांना तपास करायला मदत होईल.'


Comments
Add Comment

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Nishikant Dubey : महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंचा 'ठाकरे बंधूंवर' हल्लाबोल

बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर... नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात २३

गुरुग्राममध्ये साकारणार भारतातील पहिले ‘डिस्नीलँड’

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा

अमरनाथ यात्रेत ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू :अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ४ दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.