Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.


२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना २९ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये आणि दुसरा उपांत्य सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर २ नोव्हेंबरला होणाऱा अंतिम फेरीचा सामना बंगळुरु अथवा कोलंबो होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. अन्यथा विश्वचषकाचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होईल.



वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक



  • भारत विरुद्ध श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ५ ऑक्टोबर, कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदूर - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता


भारतात पाकिस्तानचा सामना नाही..


भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची