कुंडमळा नंतर पुण्यातील आणखीन एक पूल वाहून गेला

पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथील तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला


पुणे: पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि लोखंडी होता, हा पूल कोसळल्यानंतर त्यावर असलेले अनेकजण इंद्रायणी नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील ५१ जणांना वाचवण्यात यश आले, मात्र यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर तीन ते चारजण बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी कालपासून एनडीएआरएफ आणि अन्य पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. ही घटना ताजी असताना आणखी एक पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.


पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या तात्पुरत्या पुलाचा वापर केला जात होता. हाच पूल आता वाहून गेल्याचे समोर आले आहे.  पिंरगुट येथील तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला होता. त्यामुळे तात्पुरत्या पुलाऐवजी नव्या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा