सोने, खनिज तेल किमती अभूतपूर्व उच्चांकावर

मुंबई : इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्याचे विपरित परिणाम शुक्रवारी भारतीय बाजारातही दिसून आले. वस्तू वायदे बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅममागे प्रथमच १ लाख रुपयांपुढील पातळी गाठली, तर खनिज तेलाच्या वायदे किमतीही सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी कमकुवत बनलेल्या रुपयाने या तेजीला आणखी इंधन पुरविले.


इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरासाठी इराणने सुरू केलेल्या हालचाली आणि दक्षिण-आशियातील युद्ध भडक्याने तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची चिंतेतून संपूर्ण जगभरात वस्तू आणि भांडवली बाजारात शुक्रवारी भीतीदायी पडसाद उमटले. भारतात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढला. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच २,०११ रुपयांच्या वाढीसह, सोने प्रति १० ग्रॅमसाठी १,००,४०३ रुपयांच्या अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचले. एमसीएक्सवर, ऑगस्टसाठी सर्वाधिक व्यापार झालेले करार सोन्याचेच होते.


भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात केलेले सोने महाग झाले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमती आणखी वाढल्या आहेत. सोन्याबरोबरीनेच दुसरा मौल्यवान धातू असलेल्या चांदीतही वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सकाळच्या सत्रात चांदीमध्ये ०.७ टक्क्यांची होऊन, त्यात किलोमागे १,०६,६५७ रुपये पातळीवर व्यवहार होताना दिसून आले.


आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे शुक्रवारी एमसीएक्सवर खनिज तेलाच्या किमती पिंपामागे ५७८ रुपयांनी वाढून ६,३११ रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्या. जुलैसाठी सर्वाधिक व्यापार झालेल्या कच्च्या तेलाच्या डिलिव्हरी करारांमध्ये ५७८ रुपये किंवा १०.०८ टक्क्यांनी वाढ झाली आणि पिंपामागे ६,३११ रुपयांचा नवीन उच्चांक त्याने गाठला. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढ आणि अमेरिकी चलन मजबूत झाल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरून ८६.०७ वर बंद झाला.

Comments
Add Comment

Piyush Goyal : नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग, व्यवसायांना मिळाली चालना

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार

Plastic Currency : चलनात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Gold Rates Update : ऐन सणासुदीत सोनं महागलं! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या १२ ऑगस्टचे ताजे दर

मुंबई: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहका

SBI Locker News : SBI लॉकरमधून ५० लाखांचे दागिने गायब; पूर्ण रक्कम परत मिळणार का? RBIचा हा नियम नक्की जाणून घ्या!

कानपूर : बँकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्या की त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा अनेकांचा समज

गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील फौजदारी खटला रद्द

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक