सोने, खनिज तेल किमती अभूतपूर्व उच्चांकावर

  38

मुंबई : इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्याचे विपरित परिणाम शुक्रवारी भारतीय बाजारातही दिसून आले. वस्तू वायदे बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅममागे प्रथमच १ लाख रुपयांपुढील पातळी गाठली, तर खनिज तेलाच्या वायदे किमतीही सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी कमकुवत बनलेल्या रुपयाने या तेजीला आणखी इंधन पुरविले.


इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरासाठी इराणने सुरू केलेल्या हालचाली आणि दक्षिण-आशियातील युद्ध भडक्याने तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची चिंतेतून संपूर्ण जगभरात वस्तू आणि भांडवली बाजारात शुक्रवारी भीतीदायी पडसाद उमटले. भारतात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढला. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच २,०११ रुपयांच्या वाढीसह, सोने प्रति १० ग्रॅमसाठी १,००,४०३ रुपयांच्या अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचले. एमसीएक्सवर, ऑगस्टसाठी सर्वाधिक व्यापार झालेले करार सोन्याचेच होते.


भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात केलेले सोने महाग झाले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमती आणखी वाढल्या आहेत. सोन्याबरोबरीनेच दुसरा मौल्यवान धातू असलेल्या चांदीतही वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सकाळच्या सत्रात चांदीमध्ये ०.७ टक्क्यांची होऊन, त्यात किलोमागे १,०६,६५७ रुपये पातळीवर व्यवहार होताना दिसून आले.


आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे शुक्रवारी एमसीएक्सवर खनिज तेलाच्या किमती पिंपामागे ५७८ रुपयांनी वाढून ६,३११ रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्या. जुलैसाठी सर्वाधिक व्यापार झालेल्या कच्च्या तेलाच्या डिलिव्हरी करारांमध्ये ५७८ रुपये किंवा १०.०८ टक्क्यांनी वाढ झाली आणि पिंपामागे ६,३११ रुपयांचा नवीन उच्चांक त्याने गाठला. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढ आणि अमेरिकी चलन मजबूत झाल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरून ८६.०७ वर बंद झाला.

Comments
Add Comment

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार उसळले! दोन दिवसांच्या घसरणीला 'या' ट्रिगरचा 'स्पीडब्रेकर'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने दोन दिवसांच्या घसरणीला 'स्पीडब्रेकर' लावण्याचे काम केले आहे.

टाटा इन्व्हेसमेंट लिमिटेडकडून Stocks Splits जाहीर शेअर 'या' निकालामुळे उसळला !

प्रतिनिधी: टाटा समूहाच्या कंपनीपैकी एक टाटा इव्हेंसमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर

GST Collection: जीएसटी संग्रहणात 'इतक्या' कोटीसह महाराष्ट्रच प्रथम

प्रतिनिधी: महाराष्ट्र जीएसटी संकलनातील योगदानात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्यानंतर कर्नाटक (७%),

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

फेडरल बँक बनली चौथ्या क्रमांकाची खाजगी बँक 'असा' आहे निकाल

मोहित सोमण: तिमाही निकालासह फेडरल बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर