दररोज करा दालचिनीचे सेवन, हे आजार राहतील दूर

मुंबई: दालचिनीला इंग्रजीत सिनॅमन असे म्हणतात. अनेक लोक दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दालचिनीमध्ये मँगनीज, व्हिटामिन के, आर्यन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि अनेक बी व्हिटामिन्स असतात.


यामुळे पचनसंस्थेत सुधारणा येते. तसेच दालचिनीमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. सूज कमी होण्यास मदत होते.


दालचिनीमध्ये सूज रोखण्याचे गुण असतात यामुळे शरीराचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. तसेच पेशींना बळ देण्याचे कामही होते.


दालचिनीमध्ये पॉलिफेनॉलसह अनेक अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराला मुक्त कणांपासून होणाऱ्या ऑक्सिडेटिव्हपासून बचाव करतात.


रिसर्चनुसार, दालचिनीच्या १.५ ग्रॅमचे दररोज सेवन केल्यास मेटाबॉलिक डिसीज जसे ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचा स्तर कमी होण्यास मदत मिळते.


दालचिनीचे सेवन केल्यास हृदयरोगाची जोखीम कमी होण्यास मदत होते. दालचिनीचे सेवन तुम्ही कसेही करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी उकळून प्यायल्याने फायदा होते. यासाठी तुम्ही दालचिनीचा तुकडा अथवा त्याची पावडर पाण्यात उकळून चहाप्रमाणे पिऊ शकता.


Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि