CoinDCX Crypto News Latest: कॉईनडीसीएक्सद्वारे ट्रेडर्ससाठी ऑटोमेटेड क्रिप्टो ट्रेडिंगची सुरुवात

  86

मुंबई: भारताच्या आघाडीच्या क्रिप्टो एक्स्चेंजपैकी एक असलेल्या कॉईनडीसीएक्सने (CoinDCX) ट्रेडट्रॉनसोबत सुरळीत एकत्रीकरण (Integration) करून क्रिप्टो ट्रेडर्ससाठी ऑटोमेटेड ट्रेडिंगची सुरुवात केली आहे. या नव्या फिचरमुळे मॅन्युअल हस्तक्षेपाशिवाय,आधीच निर्धारित केलेल्या रणनीतींच्या आधारे ट्रेडर्स खरेदी/विक्री ऑर्डर्स स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करू शकतील. क्रिप्टो मार्केट २४/७ चालू असते, त्यामुळे ऑटोमेशन खूप फायदेशीर ठरेल.

कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता म्हणाले,' इक्विटी गुंतवणूकदारांमध्ये अल्गोरिधमिक ट्रेडिंग चांगलेच प्रचलित झाले आहे. डेटा दर्शवतो की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एनएसईवरील ७०% फ्यूचर्स अँड ऑप्शन्स व्यवहार अल्गोरि धमद्वारा प्रेरित होते. यावरून बाजार व्यवहारात ते किती अविभाज्य बनले आहेत, हे समजते. यामुळे मार्केटच्या वर्तनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी प्रामुख्याने मोठ्या संस्था वापरायच्या त्या ऑटोमेटेड रणनीती आता मुरलेले रिटेल ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'क्रिप्टोमध्ये, जेथे मार्केट सदा सर्वकाळ सुरू असते आणि सदैव अनिश्चितता असते, ऑटोमेशनचे मूल्य अधिकच ठळकपणे जाणवते. हा उपक्रम, संस्थात्मक दर्जाची साधने मोठ्या प्रमाणात सहभागींपर्यंत पोहोचवण्याच्या आणि क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये कार्यक्षमता वाढवण्यात मदत करण्याच्या कॉईनडीसीएक्स च्या निरंतर प्रयासाचा एक भाग आहे. ट्रेडट्रॉनसोबत आम्ही केलेल्या भागीदारीमुळे यूझर्स आता चोवीस तास आपल्या ऑटोमेटेड रणनीती तैनात करू शकतील,अ गदी ते झोपलेले असताना देखील.'

कॉईनडीसीएक्समध्ये ऑटोमेटेड ट्रेडिंगचे फायदे:

वेग आणि अचूकपणा: ऑटोमेटेड प्रणाली मार्केट डेटाच्या मोठ्या व्हॉल्यूमचे रियल टाइममध्ये विश्लेषण करतात आणि आधीच नेमून दिलेल्या अटी पूर्ण होताच ऑर्डर्स अंमलात आणतात. त्यामुळे वेळेत आणि अचूक ट्रेड होतात.

अंमलबजावणीतील शिस्त: धोरणे सातत्याने तर्कशास्त्राच्या आधारे अंमलात आणली जातात. त्यामुळे ट्रेडिंग बाबतीतील निर्णय घेण्यात भावनिक पूर्वग्रह आड येत नाहीत आणि अस्थिर बाजाराच्या स्थितीत शिस्त सांभाळली जाते.

रणनीतीचे परीक्षण आणि अनुकूलन: लाईव्ह होण्याअगोदर, ऐतिहासिक बाजार डेटाचा उपयोग करून रणनीतींचे परीक्षण करता येऊ शकते. याच्यामुळे परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यात, जोखीम व्यवस्थापनेत आणि चांगल्या परिणामांसाठी पॅरामिटर्स सुधारण्यात मदत होते.

तांत्रिक पार्श्वभूमीची आवश्यकता नाही: TradeTron चे स्ट्रॅटजी बिल्डर असताना ऑटोमेटेड ट्रेडिंगसाठी प्रोग्रामिंगचे ज्ञान असणे गरजेचे नाही. एका सोप्या इंटरफेसच्या मदतीने यूझर्स आपल्या रणनीती बनवू शकतात, त्यात बदल करू शकतात आणि त्या लॉन्च करू शकतात.

सेटअप प्रक्रिया साधी आहे आणि त्यात यूझर-फ्रेंडली इनोव्हेशनवर लक्ष केंद्रित करण्याची कॉईनडीसीएक्स ची भूमिका त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली आहे. ट्रेडर्सना फक्त आपल्या फ्यूचर्स वॉलेटमध्ये युएसडीटी जमा करावे लागतात एपीआय कीज जनरेट कराव्या लागतात, ट्रेडट्रॉनशी कनेक्ट व्हावे लागते आणि सिद्ध झालेल्या रणनीतीमधून निवड करावी लागते किंवा स्वतःची वेगळी रणनीती तयार करावी लागते. एकदा नेमून दिल्यानंतर रणनीती क्लाऊड सर्व्हर्सवर आपसूक चालत राहतात- ट्रेड करतात, पोझिशनचे व्यवस्थापन करतात आणि आपल्या पोर्टफोलियोमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष देण्यापासून वापरकर्त्यांना (Users) मुक्त करतात.
Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या