नोकरीला लावण्यासाठी साडेदहा लाखांचा गंडा

शिवसेना नेत्याविरोधात शेवगाव येथे गुन्हा दाखल


शेवगाव : महसूल खात्यात नोकरी लावून देण्यासाठी ॲढव्हान्स म्हणून साडे दहा लाख रुपये घेऊनही नोकरी लागेना.तसेच नोकरी नको म्हणून पैसे परत मागितल्यावर दिलेले चेकही वटले नाहीत.तगादे करून थकल्यावर अखेर येथील शिवसेनेच्या नेत्या,तिचे वडील व मुंबई स्थित एकाच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुक,पैसे देण्यास प्रवृत्त केले अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे .



या संदर्भात अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या,विद्याताई भाऊराव गाडेकर,तीचे वडील सेवानिवृत्त मुंबई पोलीस भाऊराव भानुदास गाडेकर व शामराव विश्वंभर लोकरे रा.निलंगा जिल्हा लातूर यांचे विरोधात गौतम अर्जुन दौंड वय ३५ रा.हातराळ ता . पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन तीन महिन्यानंतर ठरल्यानुसार साडेदहा लाख रुपये दिलेले असतांनाही ऑर्डर कशी येत नाही ? अशी विचारणा केली असता नोकरीचे काम आहे.मुंबईच्या मंत्रालयातील लोकरे साहेबांना सांगून लवकर करून घेतो.असे सांगून वेळ मारून नेत.काही दिवसानंतर आम्ही गाडेकरांना सांगितले की आम्हाला नोकरीचे काम करायचे नाही आमचे पैसे परत देऊन टाका तेव्हा गाडेकर म्हणाले की मी मुंबई येथील मंत्रालयातील साहेबांना पैसे देऊन टाकलेले आहेत.ते घेऊन तुम्हाला देतो .त्यानंतर गाडेकर एकदा आम्हाला मुंबईला घेऊन गेले.तेथे लोकरे त्यांच्याकडून आम्हाला राहुल आव्हाड यांच्या नावाने साडेसात लाख रुपयाचा चेक दिला.२९ फेब्रुवारी २०१६ रोजी तो एसबीआयच्या शेवगाव शाखेत भरला असता खात्यामध्ये पैसे नसल्याने चेक बाउन्स झाला.पुन्हा लोकरे याने माझ्या नावाने तीन लाखाचा व काकांना पाच लाख रुपयाचा चेक दिला.दोन्ही चेक शेवगाव स्टेट बँकेत दिनांक ३० मे २०१८ रोजी बँकेत भरले मात्र तेव्हांही त्यांच्या खात्यात पैसे नव्हते.तेव्हा आमच्या लक्षात आले की,भाऊराव गाडेकर,विद्या गाडेकर व श्यामराव लोकरे या तिघांनी नोकरीचे आमिष दाखवून,विद्या गाडेकर यांनी पैसे देण्यास प्रवृत्त करून आमची तब्बल साडे दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे.गुन्हयाचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे करत आहेत .

Comments
Add Comment

Pune News : धक्कादायक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा छळ, ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून

उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३

नियमित रेशन न घेणारे ठरणार अपात्र

३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क