गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता


१५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण संघर्षाची आठवण करून देते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान ४५ वर्षांतील सर्वात मोठा संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान शहीद झाले. तर काही चिनी सैनिकही ठार झाले. या घटनेमुळे भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले. या घटनेला आता ५ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच वर्षांत भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून सुरू झालेला संघर्ष हळूहळू निवळताना दिसतोय. तेव्हा आज आपण पाहणार आहोत, गलवानमधील त्या भयंकर रात्रीपासून ते संयम आणि शांततेपर्यंतचा प्रवास.


?si=1EIaP5h5pk3e8K5a

भारत - चीन सीमावाद हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला. नेहमी आगळीक काढणाऱ्या चीनने २०२० च्या मे महिन्यात सैनिकांना तिबेट पठारावर सरावासाठी पाठवले खरे, मात्र वास्तविक हे आहे की सैनिक त्यांनी भारत - चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे अर्थात एलएसीकडे वळवले. पँगॉन्ग त्सो, गलवान खोरे, डोकलाम, तवांग, नथुला, डेप्सांग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर चिनी सैन्याने अडथळे निर्माण केले. २२ मे रोजी कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी गलवान नदीवर तात्पुरता पूल बांधण्याचा प्रयत्न केला. यावर चीनने आक्षेप घेतला. ६ जून रोजी दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली, मात्र कुरापतीखोर चीनने आपलं बांधकाम कायम ठेवत भारतीय पूल तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चकमक झाली. या चकमकीत कर्नल संतोष बाबूसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ५ सैनिक ठार झाले. तर एका अहवालानुसार ३५-४० चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा आहे.



गलवानमधल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढला. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५०-६० हजार सैनिक तैनात केले, मात्र त्याचवेळी दुसरीकडे शांततेच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली. आतापर्यंत २१ कॉर्प्स कमांडर पातळीवरील बैठका झाल्या. जुलै २०२० मध्ये गलवान, फेब्रुवारी २०२१ मध्ये पँगॉन्ग त्सोचा उत्तर आणि दक्षिण भाग तर ऑगस्ट २०२१ मध्ये गोग्रा-हॉट स्प्रिंग्ज आणि सप्टेंबर २०२२ मध्ये पेट्रोलिंग पॉईंटमधून सैन्य माघारी घेण्यात आलं. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी डेप्सांग आणि डेमचोकमध्येही सैन्य माघारी घेण्यात आलं. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्थात चार वर्षांहून अधिक काळानंतर भारत आणि चिनी सैनिकांनी डेप्सांग आणि डेमचोकमध्ये गस्त सुरू केली. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी मिठाईची देवाणघेवाण करत शांततेचा संदेश दिला.


सीमावाद सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवरही प्रयत्न झाले. ३१ बैठका आणि अनेक उच्चस्तरीय चर्चांनंतर, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्तीबाबत करार झाल्याची घोषणा केली. २३ ऑक्टोबरला ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भेट घेऊन शांतता आणि परस्परांवरी विश्वासावर भर दिला. त्यानंतर ७५ टक्के सीमावाद संघर्ष संपल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.


भारताने सैनिकी सामर्थ्य दाखवतानाच २ लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केले. तसंच ११८ चिनी ॲप्सवर बंदी घातली. आर्थिक निर्बंध लादून भारतानं चीनविरोधात कठोर भूमिका घेतली. गलवान खोऱ्यातील बलिदानापासून ते शांततेच्या नव्या पर्वापर्यंत, भारताने आपली संरक्षण क्षमता आणि कूटनीतीचा योग्य प्रकारे वापर केलाय. याचा फायदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी झाला. सैन्य माघारीची प्रक्रिया झाली असली तरी भारतासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत. चीन पुन्हा कधी सीमेवर गडबड करेल, सांगता येत नाही. त्यामुळे भारताला सदैव सतर्क राहावे लागेल.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा