घरी कुणाची आजारी आई, तर कुणाचे लहान बाळ... तरी २४ तास लॅबमध्येच! फॉरेन्सिक तज्ञांची कर्तव्यदक्षता पणाला

विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे समर्पण


अहमदाबाद: विमान अपघाताची चौकशी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून केली जात आहे.  विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने दिवसरात्र एकत्र केली आहे. ३६ लोकांच्या या टीमने गेले दोन दिवस लॅबमध्ये अक्षरशः स्वतःला वाहून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांची ओळख पटण्यासाठी नातेवाईकांचा डीएनए घेतला जात आहे. ही प्रक्रिया देखील इतकी क्लिष्ट आहे की, यामध्ये थोडासाही विलंब झाला तर पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांची कर्तव्यदक्षता आता पणाला लागली आहे. (Dedication of FSL Forensic Experts)


गुरुवारी झालेल्या विमान आपघातानंतर, दुसऱ्या दिवशी घटनास्थळाहून आतापर्यंत एकूण २७० जणांचे मृतदेह आढळून आले. ज्यामध्ये विमानाचे प्रवासी तर आहेच त्यासोबत विमान जिथे कोसळले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचादेखील समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात मृत पावलेल्या लोकांची ओळख पटवणे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हानच बनले आहे.  उच्च तापमानामुळे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे, ज्यामुळे वेगाने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आतापर्यंत २५० हून अधिक मृतांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्यात आले असून, मृतदेहासोबत त्यांचे डीएनए टेस्ट केले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीममधला प्रत्येकजण सचोटीने आपले कार्य करत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे  कौतुक केले जात आहे. या संदर्भात सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीममधील काही लोकांच्या समर्पणाची माहिती शेअर केली आहे.






या पोस्टद्वारे एफएसएल फॉरेन्सिक तज्ञांच्या समर्पणाचे कौतुक केले आहे. यात असे म्हंटले आहे की, "३६ समर्पित फॉरेन्सिक तज्ञांच्या टीमने केलेले त्यांचे वैयक्तिक बलिदान खरोखरच उल्लेखनीय आहे. असेच एक उदाहरण म्हणजे एका फॉरेन्सिक तज्ञाची आई ज्याची आई सध्या तिच्या आयुष्याची झुंज देत आहे, तिचे हृदय पूर्णतः निकामी झाले असून, फक्त २०% हृदय कार्यरत आहे, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. असे  असूनही, ही तज्ञ डीएनए चाचणी प्रयत्नांसाठी वचनबद्ध आहे. शिवाय, टीममधील ८ महिला तज्ञ आहेत जी ३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या माता आहेत. त्यांच्या लहान मुलांची काळजी घेण्याच्या आव्हानांना न जुमानता, त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची निस्वार्थीपणा आणि कर्तव्याप्रती समर्पण त्यांच्या व्यावसायिकता आणि करुणेचा पुरावा आहे. आम्ही या अज्ञात नायकांना सलाम करतो जे त्यांच्या वैयक्तिक संघर्षांना न जुमानता, या दुर्घटनेने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी दिवसरात्र अथक परिश्रम करत आहेत.


आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजुला ठेवून फॉरेन्सिक टीममधील तज्ञा  विमान आपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या समस्या आणि वेदना सोडवण्यात व्यस्त आहे.  माणुसकी आणि कर्तव्याला जागणाऱ्या या फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचे समर्पण किती मोठे आहे, हे यामधून समजते.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने