परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री

  62

पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न


मुंबई : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही. शनिवारी राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी, अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा. सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत. याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी, स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल. मुंबईची या विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.

Comments
Add Comment

Maratha Aarakshan: मनोज जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल, वाहतुकीत बदल

मुंबई: मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मुंबईत दाखल झाले आहेत. येथे

जरांगेंच्या नेतृत्वात हजारो समर्थक मुंबईत धडकणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी

'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन

सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजा चरणी लीन

राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शन मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात