Kundamala Bridge Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

  81

मुंबई : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आज, रविवारी कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एकूण ३८ व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी १८ व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. २५ पेक्षाही अधिक लोकं या नदीत वाहून गेलीत तर काहीजण पुलाखाली दबली गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


रविवार असल्याने बरेच पर्यटक वर्षा सहलीसाठी आले होते. यातील कित्येकांनी जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावर वाहनं उभी केली आणि ओव्हरलोड झाल्याने पूल कोसळला. दरम्यान, घटनास्थळी पुण्याचे जिल्हाधिकारी दाखल होत त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.


वीकेंड असल्यामुळे इंद्रायणी नदीचा वाढता प्रवाह पाहण्यासाठी सुमारे १०० ते १२० लोक घटनास्थळी जमले होते. काही लोक त्यांच्या दुचाकींसह पुलावर चढले, ज्यामुळे पुलाचा भार आणखी वाढला. जास्त भारामुळे पूल कोसळल्याचे मानले जात आहे. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. स्थानिक पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदर घटनेबद्दल म्हणाले की या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्थानिक आमदार सुनील शेळके म्हणाले की या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तूर्तास मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी लवकरच ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी