मणिपूरमध्ये ३२८ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

इम्फाल : मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या इंम्फाल खोऱ्यातील 5 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. यामध्ये 328 स्वयंचलीत बंदुकांसह मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड आणि दारूगोळ्याचा समावेश असल्याची माहिती माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षणक लहरी दोरजी लहटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुरक्षा दलांनी 13 व 14 जूनच्या मध्यरात्री इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांत ही धडक कारवाई करत स्फोटके आणि इतर शस्त्रसामग्री जप्त केली. यामध्ये 151 एसएलआर रायफल्स, 65 इन्सास रायफल्स, इतर प्रकारच्या 73 रायफल्स, 5 कार्बाइन गन, 2 एमपी-5 गन अशा एकूण 328 स्वयंचलीत बंदुकी आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्‍या आधारे मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असेही लहटू यांनी स्‍पष्‍ट केले.

भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली, 26 मे ते 5 जून दरम्यान मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने कांगपोक्पी, थौबल, काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर, जिरीबाम, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगरी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांवर आधारित ऑपरेशन्स सुरू केल्या, असे एका निवेदनात म्‍हटले आहे. या ऑपरेशन्समध्ये 23 फुटीरवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला