Swwapnil Joshi: मराठी अभिनेता स्वप्नील जोशीसाठी 'फादर्स डे' झाला खास, लेकीसाठी लिहिली खास पोस्ट !

Swapnil Joshi Post on Fathers Day: प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेक ही सर्वस्व असते! मराठी अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी सोबत असंच काहीतरी फादर्स डे निमित्त घडलं आहे. आणि त्यासाठी त्याने त्याची लेक मायराबद्दल खास पोस्ट लिहीत तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कारण ही तसं खासच आहे! ते म्हणजे मायरा एका गोड गाण्यातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकत आहे.





अनेक कलाकार आणि त्यांची मुल या इंडस्ट्रीचा भाग आहेत अश्यातच स्वप्नील जोशीच्या चिमुकलीनेही एका व्हिडिओ अल्बममधून या इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्ते याने स्वरबद्ध केलेल्या " सांग आई " या गाण्यात मायरा जोशीने अभिनय केला आहे. बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्वप्नीलची लेक देखील या इंडस्ट्रीचा आता भाग झाली आहे.


स्वप्नीलसाठी हा फादर्स डे या गाण्यामुळे नक्कीच खास झाला आहे.  स्वप्नीलने सोशल मीडिया वर एक खास पोस्ट लिहून त्याचा लेकीच कौतुक तर केलं आहे, सोबतीला स्वप्नील सांगतो "आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. मायराच्या आवडी पोटी तिने केलेलं हे छोटं काम आहे. हे तिचं सिनेसृष्टीतील पदार्पण नाही पण तुम्ही सगळ्यांनी तिला जे प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार ! आमच्या सगळ्यासाठी हा तिचा क्षण खूप मौल्यवान आहे. तिने तिच्या बाबाला दिलेलं हे खास गिफ्ट आहे"





स्वप्नीलने बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता लेकीला या खास गाण्यातून बघताना त्याला खूप आनंद होत आहे. येणाऱ्या काळात या बाप लेकीची जोडी ऑन स्क्रीन बघायला मिळणार का ? हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.