ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

मुंबई (खास प्रतिनिधी): ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनेनंतर दादर, वडाळा रेल्वे स्थानक तसेच फाईव्ह गार्डन परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देवून खाद्यपदार्थ विक्रीसाठी सिलिंडर सारख्या ज्वलनशील वस्तू तथा पदार्थ जप्त करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.



अमेय घोले यांनी महापालिकेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात एका बेकायदेशीर फेरीवाल्याच्या दुकानात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे गंभीर अपघात घडला. अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांकडे कोणतीही अधिकृत परवानगी आणि सुरक्षिततेची हमी किंवा नियंत्रण नसल्याने अशा घटनांनी नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. अशाप्रकारे चिंता व्यक्त करतानाच त्यांनी दुर्दैवाने, एफ उत्तर विभागातील दादर रेल्वे स्थानक, वडाळा रेल्वे स्थानक व फाईव्ह गार्डन परिसरातही अशा प्रकारचे बेकायदेशीर फेरीवाले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडेही अशा प्रकारचे गॅस सिलिंडर, स्टोव्ह, इतर ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर भविष्यात ऐरोलीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण करते.

त्यामुळे या सर्व ठिकाणांवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांची तपासणी करून त्वरित कारवाई करावी. तसेच जे फेरीवाले गॅस सिलिंडर, स्टोव्ह, किंवा तत्सम साहित्य वापरत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
Comments
Add Comment

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन