क्रिकेटच्या नव्या नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार

लॉर्ड्स : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सर्व नवे नियम कसोटी क्रिकेटमध्ये १७ जूनपासून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ जुलैपासून आणि T20 क्रिकेटमध्ये १० जुलैपासून लागू होणार आहेत. नव्या नियमांपैकी एका नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात २५ षटकांनंतर चेंडू बदलला जातो. नव्या नियमानुसार पहिल्या ३४ षटकांमध्ये दोन चेंडू वापरता येतील. नंतर ३५ ते ५० व्या षटकादरम्यान वापरलेल्या या दोन चेंडूंपैकी एक चेंडू वापरावा लागेल. जर सामना २५ षटकांपुरता मर्यादीत झाला तर एकच चेंडू वापरता येईल.

नाणेफेक होण्याआधी प्रत्येक संघाला पाच कन्कशन सब्सटीट्युट्स – एक फलंदाज, एक यष्टीरक्षक, एक गोलंदाज, एक फिरकीपटू, एक अष्टपैलू – यांची यादी सामनाधिकारी यांच्याकडे द्यावी लागेल. खेळाडूला दुखापत झाल्यास या यादीतून बदली खेळाडू घेण्याचे बंधन असेल. फलंदाजाच्या बदल्यात फलंदाज, गोलंदाजाच्या बदल्यात गोलंदाज, फिरकीपटूच्या बदल्यात फिरकीपटू, अष्टपैलूच्या बदल्यात अष्टपैलू, यष्टीरक्षकाच्या बदल्यात यष्टीरक्षक घेण्याचे बंधन असेल.

सीमारेषेबाहेर म्हणजेच बाउंडरी लाईनच्या बाहेर “बन्नी हॉप” करत घेतले जाणारे झेल अमान्य अर्थात अवैध असतील. क्रिकेटमध्ये चुरस वाढवणे, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन राखणे आणि खेळ आणखी रंगतदार करणे यासाठी हे नियम करण्याचा निर्णय झाला आहे.

बन्नी हॉप म्हणजे काय ?

क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेबाहेर असताना त्याने चेंडू उडवणे आणि नंतर मैदानात येऊन झेलणे या पद्धतीने झेल घेण्याला 'बन्नी हॉप कॅच' म्हणतात. या 'बन्नी हॉप कॅच'ला अवैध ठरवण्यात आले आहे. पण क्षेत्ररक्षकाने मैदानात असताना चेंडू उडवला, नंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर गेला आणि तिथून परत मैदानात आल्यानंतर त्याने चेंडू झेलला तर ते वैध आहे.
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना