भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. अमरावतीत काही दिवस बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन मिळताच बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवले. यामुळे शांतता निर्माण होत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शेतकरी शिरला. आमदाराचा बंगला जाळण्याची भाषा करत शेतकरी बंगल्यात दाखल झाला होता.

कुटेंच्या स्वीय सहायकाने शेतकऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३३, ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

खरीप हंगामासाठी शेत जमीन तयार केली होती. पण जून ऐवजी मे महिन्यात पाऊस पडला. यामुळे काही महत्त्वाची कामं होण्याआधीच पूर्ण जमीन निसरडी झाली आणि शेतीची आधी केलेली कामं वाया गेली. यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी आमदाराचा बंगला जाळण्यासाठी आला होता.
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी