डब्ल्यूटीसी फायनल : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत द.आफ्रिकेने २७ वर्षांनी पटकावले आयसीसी विजेतेपद

ऑस्ट्रेलियाला नमवत 'चोकर्स' पुसला डाग


लंडन : डब्ल्यूटीसी फायनल्स अर्थातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात केली. या विजयासह आफ्रिकन संघाने आपल्यावरील ‘चोकर्स’ हा शिक्का अखेर पूसून टाकला आहे. कगिसो रबाडा, एडेन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा हे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.


ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना एडेन मार्करम आणि टेम्बा बावुमाने १५० हून अधिक धावांची भागिदारी रचत आफ्रिन संघाच्या विजयाचा पाया रचला. मार्करने १३६ तर कर्णधार बावुमाने ६६ धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय साकारुन दिला. तर या सामन्यात एकूण ९ गडी बाद करणारा कगिसो रबाडा खऱ्या अर्थाने या संघांच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात शतक झळकावणारा मार्करम सामनावीराचा मानकरी ठरला.


१९९८ मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यांना तबब्ल २७ वर्षांपासून एकदाही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आलेली नव्हती. आययसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये कायमच मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ अशीच त्यांची क्रिकेट विश्वात ओळख होती. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली आपल्यावरी चोकर्सचा शिक्का पुसण्यात २७ वर्षांनी यश मिळालं आहे.



ज्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासात अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊन हार पत्करली, त्याच दक्षिण आफ्रिकेने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर अखेर इतिहास रचला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवत २७ वर्षांचा ‘चोकर्स’ डाग पुसून टाकला आणि आयसीसी ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. याआधी १९९८ साली दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावा केल्या, ज्यात ११ चौकारांचा समावेश होता. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने ६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला तीन विकेट घेतले. फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरीही निराशाजनक होती. परिणामी, संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ १३८ धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमाने ८४ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कला दोन विकेट मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली.


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सात विकेटवर ७३ धावा होत्या. येथून, यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया २०७ धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने १३६ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. अॅलेक्स कॅरीने ५० चेंडूत ५ चौकारांसह ४३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानेही दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन विकेट मिळवले. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले.


२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ७० धावांवर आपला दुसरा विकेट गमावला. येथून एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे काम सोपे झाले. या भागीदारीदरम्यान मार्करामने १०१ चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मार्कराम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला. तर बावुमाने १३४ चेंडूत ६६ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने बावुमाला धावबाद केले. आपल्या संघाचा विजय निश्चित केल्यानंतर मार्करामही बाद झाला. त्याने २२७ चेंडूत १३६ धावांची सामना जिंकणारी खेळी केली. या दरम्यान त्याने १४ चौकार मारले. मार्कराम बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता होती. अखेर आफ्रिकेच्या वेरियने एक धाव काढून संघाला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या