भारतीय अंतराळवीर १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होणार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन १९ जून रोजी रवाना होणार आहे. याआधी वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे मागील काही दिवसांत ही मोहीम वारंवार पुढे ढकलली जात होती. आधी प्रतिकूल हवामानामुळे, नंतर यानातील वायू गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी एक्स पोस्ट करुन अ‍ॅक्सिओम-४ मिशन १९ जून रोजी रवाना होत असल्याचे सांगितले. स्पेसएक्स कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नासा, इस्रो, अ‍ॅक्सिओम स्पेस आणि स्पेसएक्स कंपनी संयुक्तपणे अ‍ॅक्सिओम-४ मिशन राबवत आहेत.

मोहीम सुरळीत आणि सुरक्षितरित्या व्हावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे. किरकोळ चूक नंतर जीवघेणी ठरू शकते. यामुळेच तांत्रिक दोष लक्षात येताच ते दूर करण्यासाठी मोहीम काही काळ पुढे ढकलली होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अ‍ॅक्सिओम-४ मिशन १९ जून रोजी रवाना होईल, असे या मोहिमेशी संबंधित असलेल्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड आणि हंगेरीचेही अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

 
Comments
Add Comment

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे