पंतप्रधान मोदी चार दिवस विदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांना या परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी १६ ते १७ जून दरम्यान कॅनडाच्या दौऱ्यावर असतील. विशेष म्हणजे ते जी-७ शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा सहभाग होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी जी-७ देशांचे नेते, इतर निमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना, विशेषतः एआय-ऊर्जा संबंध आणि क्वांटम तंत्रज्ञान संबंधित महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा करतील.



शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या अनेक द्विपक्षीय बैठकाही होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे पीएम मोदी जी-७ शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा सुरु होती. पण कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ शिखर परिषदेचे निमंत्रण दिले आहे. त्यापूर्वी सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी १५ ते १६ जून दरम्यान सायप्रसला अधिकृत भेट देतील.


दोन दशकांच्या काळातील भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसचा पहिलाच दौरा असेल. सायप्रसमधील निकोसियामध्ये पंतप्रधान मोदी क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच ते लिमासोलमध्ये उद्योजकांना संबोधित करतील. या त्यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तर पंतप्रधान मोदी १८ जून रोजी क्रोएशिया दौऱ्यावर असतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे