'प्रहार' Exclusive शनिवार विशेष - बाजारात अस्थिरतेची नांदी का गुंतवणूकदारांची चांदी ?

मोहित सोमण


शेअर बाजारात सर्वकाही आलबेल नाही किंबहुना तेलाच्या व सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत एप्रिलमध्ये ३५०० डॉलर प्रति औंस (Ounce) येवढी सर्वोच्च वाढ झाली होती. आज ३४३३.४७ प्रति औंस दरावर गोल्ड फ्युचर निर्देशांक स्थिरावला आहे. एमसीएक्सवर सोन्याचे निर्देशांक आजही ०.०४% वाढले आहेत याआधी चारवेळा सोन्यात वाढ झाली होती. काल एमसीएक्स निर्देशांकात १.७६% वाढ झाली होती. १२ जूनला सोने निर्देशांकात १.४१% वाढ झाली होती तर गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.५०% वाढ झाली होती.


त्यामुळे सातत्यानं सोने वाढत आहेच पण कच्च्या तेलाच्या निर्देशांकात भरमसाठ वाढ होत आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव, मध्यपूर्वेतील दबाव, इराण इस्त्राईल संघर्ष, अमेरिकन बाजारातील महागाई घटल्याने, तसेच अमे रिका चीन बोलणी, युरोप- अमेरिकन बाजारातील व्यापारी चर्चा या सगळ्याच कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत चांगलीच तेजी येत आहे. डॉलरच्या किंमतीत चढउतारामुळे बाजारातील अस्थिरता वाढली आहे. सोन्याखेरीज शनिवारी चांदीचा दरही प्रति ग्रॅम ११० रुपये आणि प्रति किलो ११०००० रुपये इतका स्थिर राहिला. दागिने खरेदीदारांसाठी चांदी हा सोन्याचा स्वस्त पर्याय म्हणून ग्राहक पसंती देत आहेत. म्हणूनच जेव्हा जेव्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते तेव्हा तेव्हा चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. चांदीच्या प्रति किलो किंमतीत ५० ते १५० रूपयांनी चढउतार दिसून आली. कालपर्यंत चांदीही १००० रूपये प्रति महागली होती.


दुसरीकडे कच्च्या (Crude) तेलाच्या किमतींत प्रचंड मोठी वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यातीलच विचार केल्यास या आठवड्यातील किंमतीत ४.९४% वाढ झाली आहे. काल क्रूड तेलाच्या निर्देशांकात व किंमतीत 'महाकाय' वाढ झाली होती. आजचा दर विचारात घेतल्यास कालपेक्षा कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ७.२६% म्हणजेच जवळपास साडेसात टक्क्यांनी वाढ झाली. तर Brent Future मध्येही ७.०२% वाढ झाली आहे. एमसीएक्स (Multi Commoi ty Exchange MCX) वर आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ७.५५% वाढ झाली आहे. काल कच्च्या तेलाच्या किमती ७ टक्क्याने वाढल्या होत्या. शेवटच्या आठवड्यात Brent १२.५%, WTI १३% वाढले आहे. जानेवारी महिन्यापासून झालेली सर्वात मोठी वाढ झाली आहे.


ही झाली पार्श्वभूमी. आता प्रश्न उरतो शेअर बाजाराचा. बीएसई (Bombay Stock Exchange)व एनएसई (National Stock Exchange) दोन्हीमध्ये गेल्या आठवड्यात निफ्टी ०.६८% खालावला होता व बीएसई सेन्सेक्स ०.७०% खालावला होता. यातूनच संभाव्य धोक्याची पातळी आपल्याला लक्षात आलेली असेल. यातून बाजारातील अस्थिरता आणखी वीआयएक्स (Volatility Index) याला खतपाणी घालत आहे. या संपूर्ण आठवड्यात VIX हा १५.५४ इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यातून फंडामेंटलवर काय फरक पडतो हे लक्षात आले असेलच. शेअर बाजारात गुंतवणूक करताना एफआयआय (Foreign Institutional Investors FII) म्हणजेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार एकीकडे गुंतवणूकीत वाढ करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ नव्या एनएसडीएल (National Security Depository Limited NSDL)अहवालानुसार या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ३३४६.९४ कोटींची गुंतवणूक केली तर दुसरीकडे याच अहवाला त म्हटल्याप्रमाणे जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ३२७५.७६ कोटींची गुंतवणूक त्यांनी काढून घेतली. बाजारात काही प्रमाणात भारतीय घरगुती किरकोळ (Domestic Retail Investors) बाजारात सपोर्ट लेवल पुरवत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र प्रश्न असा उरतो की बाजारातील रेपो दरांमध्ये कपात झाल्यानंतरही काही दिवसांपासून पुन्हा बँक निफ्टीत सुरु झालेली घसरण काय संदेश देऊन जाते? त्यातून कर्जाच्या व्याजदरात कपात झाली असली तरी मुदतठेवी व्याजदरात कपात सुरु झाली आहे.


आरबीआयने अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे त्यात वादही नाही परंतु सतत बाजारातील अस्थिरता ही आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावावर मोठ्या प्रमाणात अवलंबून झाली आहे हे देखील तितकेच सत्य आहे. गुंतवणूकदार सुर क्षित गुंतवणूकीत जगत असल्याने इक्विटी गुंतवणूकीत घट होत आहे. म्युचल फंड गुंतवणूकीत म्युचल फंड असोसिएशनचा अधिकृत माहितीनुसार, मे महिन्यात घट झाली आहे. तर एसआयपी (SIP) मध्ये घट झाली आहे. हे कशाचे द्योतक आहे? तर यावर बारकाईने विचार केल्यास एक गोष्ट लक्षात येऊ शकते ती म्हणजे अस्थिरता. यापूर्वीही आशियाई व्यापाराच्या सुरुवातीच्या काळात जागतिक बाजार घसरले. अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्ये १% पेक्षा जास्त घसरण झाली, तर डॉलर सोने मजबूत झाले. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेषतः सामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवूनच सुरक्षित गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापन करताना कुठल्याही एका ब्लुचीप शेअरचा विचार न करता समग्र विचार करणे गरजेचे आहे.


बाजारातील अस्थिरता ही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ती पूर्णपणे नियंत्रणात आणणे शक्य नाही. परंतु बाजारातील दबाव पातळी पाहता याहुनही बिकट अवस्था बाजारात होऊ शकते का ? त्यासाठी गुंतवणूकदारांनी काय करावा असा प्रश्न पडतो. यासाठी आम्ही बाजार अभ्यासक अजित भिडे यांच्याशी बोलताना याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'इस्त्राईल व ईराण यांच्यात आज दोन दिवस युद्ध सुरू आहे. इराणने सुद्धा प्रतिउत्तर अधिक तीव्र दिलेले आहे. अनेक रहि वासी भागात याची क्षती पोहोचली आहे त्यामुळे इस्राईल याचे उत्तर नक्कीच देईल एकंदरीत परिस्थिती ही पुढील आठवड्यात स्पष्ट होईल कि हे युद्ध किती काल चालेल. त्यानुसार कच्चे तेलाचे भाव अवलंबून असतील. आत्ताच ७० डाॅलरच्या वर वाढलेय अजून जर दर वाढत राहिले तर त्याचा थेट परिणाम बाजारावर होईल व बाजारातील मागील तीन आठवड्याची तेजी संपेल व पुर्व पदावर येईल अशीही शक्यता आहेच. मागील काही युद्धाची परिस्थिती पहाता तिसरे विश्व युद्धाची शक्यतेवर जास्त भर दिला जात आहे.आजही इस्राईलच्या विरोधात किती आखाती देश या युद्धात सहभागी होतील हा खरा प्रश्न आहे,येमेन युद्धात भाग घेत असल्याबद्दल बातमी येत आहे. आज प्रत्यक्ष ईसराईल समोर दिसत असला तरी अमे रिका बरोबर आहेच. त्यामुळेच पुढील काही दिवस बाजाराची दिशा ठरवतील.तेलाचे भाव व विश्व व्यापारावर काय परिणाम होतील यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल.'


त्यामुळेच बाजारात गुंतवणूक करताना तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी. जेणेकरून एकीकडे झालेले नुकसान दुसरीकडून भरून काढता येईल. काल भारतीय सरकारी रोखे उत्पन्न पाच आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले कारण तेलाच्या वाढत्या किमती आणि साप्ताहिक कर्ज लिलावापूर्वीच्या सावधगिरीमुळे कमी उत्साह दिसला होता. भारत हा कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार आहे. त्यामुळे क्रूडचा परिणाम बाजारावर होऊ शकतो. तत्पूर्वी कुठेही गुंतवणूक करताना सामान्य नागरिकांनी सोन्याचांदीच्या गुंतवणूकीत पैसा टाकतानाही परिस्थिती मापून गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. शेअर बाजारातील यापुढील काही दिवस मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये दिसू शकते तरीही या बाजाराचे मुल्यांकन करताना कुठलीही गुंतवणूकीत केलेली चूक महागात पडू शकते. बाजारातील अस्थिरता कायमची नष्ट करणे शक्य नाही मात्र संभाव्य परिस्थिती संयमी गुंतवणूक व घाई न करता केलेली गुंतवणूक कामाला येते. पुढील काही दिवस बाजार अस्थिरता अधिक असू शकते. मात्र एसआयपीची दीर्घकालीन गुंतवणूक या अस्थिर बाजारातही चांगला परतावा (Returns) देऊ शकते.

Comments
Add Comment

Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ; ३५ प्रवासी जखमी

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर ते वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री ११.३० वाजता एका खासगी कंपनीच्या

Cyber Threat : इस्रो मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

Canva glitch : कॅनव्हा सेवेवर तांत्रिक संक्रांत; जगभरातील वापरकर्त्यांना फटका, सेवा आता पूर्वपदावर

डिझाइनिंग क्षेत्रातील आघाडीचे प्लॅटफॉर्म असलेल्या 'कॅनव्हा' (Canva) वर २ जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील

Nashik : मडक्यात सापडला ‘गावठी कट्टा’; पोलिसांच्या तपासानंतर मात्र वेगळंच सत्य समोर

Nashik : सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात एका घराबाहेर ठेवलेल्या रिकाम्या पाण्याच्या मडक्यात बंदुकीसारखी वस्तू

Salman Khan : ॲनिमे प्रिंटपासून पॅचवर्क पँट्सपर्यंत... सलमान खानने आपल्या हटके ट्राउझर्सद्वारे निर्माण केला नवा फॅशन ट्रेंड!

Salman Khan : फॅशन (Fashion) , लाईफस्टाईल (Lifestyle) अन अॅक्टींग (Acting) पहावी ती सलमान खानचीच (Salman Khan) असे सलमान प्रेमी म्हणजेच भाईप्रेमी