POCO F7 Nothing Phone 3 Update: पोको एफ ७ व नथिंग फोन ३ लवकरच भारतात जाणून घ्या फिचर्स 'या' गोष्टी टिप्सस्टरकडून लीक

प्रतिनिधी: वनप्लस १३ एस (One Plus 13S) स्मार्टफोन लाँचनंतर लवकरच पोको एफ ७ (Poco F7), नथिंग फोन ३ (Nothing Phone 3) हे बाजारात येऊ शकतात.पोको एफ ७ हा जुनमधील शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे ‌तर नथिंग फोन हा १ जुलैला भारतात लाँच होणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी तरूण वर्गात मोठी क्रेझ आहे. या दोन्ही फोनच्या लिगसीमुळे या दोन्ही स्मार्टफोन सिरीजचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पोको एफ ७ हा पॉवरफूल स्मार्ट फोन भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे तर नथिंग फोन ३ हा भारतात अमेझॉनवर ग्राहकांना उपलब्ध असेल.


पोको फोन हा त्यांच्या बँटरी व तगडा परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. यावेळी लीकनुसार या फोनची बॅटरी ७५५० mah ची असू शकते. फ्लिपकार्टवर या फोनच्या जाहिराती आणण्यास सुरूवात झाली आहे. 'Indian Biggest Battery ' अशी टँगलाईन या फोनला देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार पोको फोनची बॅटरी पोको ६ तुलनेत ५० टक्क्याने अधिक सक्षम करण्यात आलेली आहे. परदेशी हा फोन रेडमी टर्बो ४ या नावाने प्रदर्शित झाला होता.


पोको एफ ७ ची अपेक्षित फिचर्स (Poco F7 Specifications)-


Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर


LPDDR5X 12 GB Ram


UFS 4 Storage


6.83 inch 1.5 k flat OLED display


50 Megapixel (OIS) + 8 Megapixel (ultra wide)


20 Megapixel Selfie Camera


पोको एफ ७ हा फोन बाजारात येताना ग्रे/ ब्लँक रंगात येऊ शकतो.


उपलब्ध माहितीनुसार, उत्पादकाने फ्लिपकार्टवर संकेत दिले की सामान्य वापरामुळे बॅटरीचे आयुष्य २.१८ दिवसांपर्यंत वाढेल आणि ८०% क्षमतेवर १६०० सायकल दीर्घकाळ टिकतील. याव्यतिरिक्त, फोनमध्ये ९०W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट असेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना भविष्यातील POCO F7 स्मार्टफोनसह २२.५W ची बॅटरी वापरता येणार आहे. गीकबेंचकडे परत जाताना, ज्या पोको एफ ७ युनिटची चाचणी घेण्यात आली होती त्यात १२ जीबी रॅम आहे. पोको इंडिया चे नेतृत्व करणारे हिमांशू टंडन यांनी १० जून रोजी एक पोल पोस्ट केला होता ज्यामध्ये विचारण्यात आले होते की, 'फ्लॅगशिप लेव्हल चिपसेट असलेल्या शक्तिशाली डिव्हाइससाठी आदर्श सुरुवातीचा प्रकार कोणता असावा?' याला मोठा प्रति साद नेटिझन्सकडून मिळाला होता. Snapdragon 8s Gen 4 हा टीएसएमसीच्या ४एनएम नोड (एन४पी) वर बनवण्यात आला आहे. मागील ८एस चिप्सप्रमाणे, हा ८ एलिट आणि एक्स चिप्समध्ये दिसणाऱ्या नवीन ओरियन कोरऐवजी एआर एम कॉर्टेक्स-आधारित क्रियो कोर Snapdragon कंपनीकडून वापरला जाणार आहे.


याशिवाय Nothing Phone 3 ची बाजारात जोरदार उत्सुकता आहे. पहिल्या दोन नथिंग फोनने टेकयुजर्सला वेड लावले होते. पूर्वाश्रमीचे वनप्लसचे सीईओ व आताचे नथिंगचे संस्थापक कार्ल पी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून फोनबद्दल ग्राहकात उत्सुकता निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वीच फोनचा टिजर सोशल मीडियावर प्रकाशित झालेला आहे. त्यातील माहितीनुसार, टीझरमध्ये डिव्हाइसच्या पूर्वी लीक झालेल्या रेंडरवरून तपशीलांची पुष्टी करण्यात आली आहे, ज्यामध्ये तीन सेन्सर असलेल्या कॅमेरा मॉड्यूलसह एक परिचित डिझाइन दाखवण्यात आले आहे ज्यापैकी एक पेरिस्कोप-शैलीचा टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. हा फोन फ्लॅगशिप प्रोसेसरद्वारे चालवला जाईल आणि त्यात 5000 mAh बॅटरी असू शकते. यात अलीकडेच लाँच झालेल्या फोन (3a) प्रो सारखाच डिस्प्ले असू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करणारा 6.77-इंच 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे.


जगभरात लाँच होण्यापूर्वी सर्वप्रथम वॉलमार्टवर हा फोन येऊ शकतो. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत 12GB/256GB - 799$, व 16GB/512GB साठी किंमत 899$ आहे. भारतात या फोनची किंमत 59999 पासून पुढे असू शकते. कंपनीने म्हटल्याप्रमाणे या फोनची निर्मिती भारतातच होणार आहे.


मागील अहवालांनुसार, कंपनी आगामी नथिंग फोन ३ मध्ये उच्च दर्जाचे स्पेसिफिकेशन (Features) दिले जातील. याचा अर्थ असा की ते डायमेन्सिटी 9400 SoC किंवा स्नॅपड्रॅगन 8 सिरीज चिपचा वापर कंपनी करू शकते.


Nothing Phone 3 ची अपेक्षित फिचर्स - (Nothing Phone 3 Expected Specifications) -


अलीकडेच, टिपस्टर मॅक्स जॅम्बोरने X वर नथिंग फोन 3 चा रेंडर शेअर केला आहे. त्यातून फोनचा अंदाज जागतिक बाजारपेठेत आला होता. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दाखवला आहे जो फोन 3a मालिकेतील नाविन्यपूर्ण डिझाइनशी समान जाणवतो आहे.


अशी असतील फिचर्स -


१) Qualcomm Snapdragon 8 Elite Processor


२) 12 GB Ram/512 GB


३) 5000 mah battery, 45 W wired charing and 15W wireless Charging


४) Android 15 User Interface - Nothing OS 3


५) मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा ज्यामध्ये एक 50MP प्रायमरी, 50MP सेकेंडरी आणि 50MP थर्ड कॅमेरा सेन्सर


६) Display - 6.77 inch AMOLED Display


गेल्या महिन्यात कंपनीचे संस्थापक कार्ल पी यांनी एक सोशल मीडियावर ' हिंट' दिली होती. त्यानुसार हा फोन ९०००० रूपयांच्या आसपास असू शकतो. त्यामुळे या फोनबद्दल जोरदार उत्सुकता असल्याने चाहते या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Crime News : गणेशच्या आत्महत्येचा उलगडा होणार, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ

Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई

Fashion Tips: तुमचा ड्रेसिंग सेन्स बोरिंग वाटतोय? वॉर्डरोबमध्ये ॲड करा 'या' गोष्टी; तुमची पर्सनालिटी एका क्षणात बदलेल

तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश

Jeans Styling Tips : प्रत्येक मुलीने ट्राय करावेत जीन्ससोबतचे 'हे' ८ स्टायलिश टॉप्स

बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt) https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/ ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट

Nashik : खाकीला डाग ! 10 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार रंगेहात ताब्यात

Nashik : खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात

Nashik : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के