NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : नीट-यूजी २०२५ (NEET-UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत १७ हजारांनी घटली आहे.


या वर्षी राज्यातून २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


सर्वोच्च १० गुणवंतांमध्ये महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशीने देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर आरव अग्रवालने दहावा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय, मुलींच्या टॉप-२० यादीतही महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवली. सिद्धी बढे (३री), ऊर्जा शहा (५वी) आणि इश्मित कौर (१२वी) यांनी आपले नाव उज्वल केले.



ही परीक्षा यंदा ४ मे रोजी भारतासह परदेशातील ५,४६८ केंद्रांवर पार पडली. अबूधाबी, दुबई, शारजा, दोहा, सिंगापूर यांसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांसाठीही केंद्रे उपलब्ध होती.


परीक्षा इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली गेली. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, देशभरातून १२ लाख ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले असून, याच आधारे त्यांना वैद्यकीय, दंतवैद्यकीय व इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे.


विद्यार्थ्यांना निकाल आणि गुणवत्ता यादी (https://neet.nta.nic.in/) या संकेतस्थळावर पाहता येईल.

Comments
Add Comment

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात

बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले

ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चा मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा

मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतरच महापौरपदाचा निर्णय

शिवसेनेने अडीच वर्षांकरिता महापौरपद मागितले ही अफवा स्पष्ट जनादेशानंतर जनतेला वादविवाद आवडणार नाही मुंबई :