Dubai Marina Fire: दुबईतील मरीना टॉवरला महाकाय आग! ३,८२० जणांना काढले बाहेर, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

अबूधाबी: शुक्रवारी रात्री उशिरा दुबईच्या मरीना या ६७ मजली टॉवरला भीषण आग लागली, ही आग इतकी भयानक होती. की त्याच्या ज्वाळाने संपूर्ण इमारत गिळंकृत केल्याचे भासत होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


दुबईच्या मरीना या गगनचुंबी इमारतीला लागलेली महाकाय आग आटोक्यात आणण्यासाठी, दुबई सिव्हिल डिफेन्सकडून त्वरित मदत मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांनंतर आग यशस्वीरित्या विझवली. विशेष बाब म्हणजे या इमारतीमधील  सर्व ३,८२० रहिवाशांना कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. खबरदारी म्हणून ट्राम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती, तर त्या बदली शटल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. 



दुबई मरीना टॉवरची आग आटोक्यात, कोणतीही जीवितहानी नाही


दुबई मरीना येथील ६७ मजली निवासी इमारतीत मोठी आग लागली, परंतु सहा तासांत ती आटोक्यात आली.  ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  सुमारे सहा तास धगधगत असलेली ही आग शनिवारी पहाटे दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी यशस्वीरित्या विझवली.





X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या दुबई मीडिया ऑफिस (DMO) कडून अधिकृत अपडेट्सनुसार, अग्निशमन दल, रुग्णवाहिका पथके आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन सेवांनी या घटनेला तातडीने प्रतिसाद दिला. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ७६४ अपार्टमेंटमधील सर्व ३,८२० रहिवाशांना कोणत्याही दुखापतीशिवाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जवळच्या एका रहिवाशाने पत्रकारांना सांगितले की, “पहाटे १:३० वाजता आग नियंत्रणात आली. मात्र गेल्या दोन तासांपासून आग जळत आहे. त्यामुळे आजूबाजूला भरपूर कचरा आणि धूर झाला आहे. असे दिसते आहे की नागरी संरक्षण आगीवर नियंत्रण मिळवत आहे.”



दुबई नागरी संरक्षण पथकांचे कौतुक


ऑपरेशन दरम्यान अंमलात आणलेल्या नियंत्रण धोरणांमुळे आजूबाजूच्या कोणत्याही इमारतींना धक्का बसला नाही. जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या कार्यक्षम आणि जलद प्रतिसादाबद्दल दुबई नागरी संरक्षण पथकांचे कौतुक करण्यात आले.



ट्राम सेवा तात्पुरती विस्कळीत


आगीला विजवण्याच्या प्रयत्नांमध्ये, दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने (RTA) दुबई मरीना स्टेशन (क्रमांक ५) आणि पाम जुमेरा स्टेशन (क्रमांक ९) दरम्यान ट्राम सेवा तात्पुरती स्थगित केली होती. प्रवाशांची आणि ऑपरेशनल कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राधिकरणाने सांगितले.  मात्र या दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीएने प्रभावित ट्राम स्थानकांमध्ये बदली शटल बस सेवा सुरू केली होती. तर उर्वरित ट्राम नेटवर्क पूर्णपणे कार्यरत राहिले.


Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात