हृदयविकाराने नव्हे तर मधमाशी तोंडात गेल्याने झाला संजय कपूर यांचा मृत्यू, कंगणाने केला खुलासा

नवी दिल्ली: बॉलीवूड क्वीन आणि भाजपची खासदार कंगना राणौतने इंस्टाग्रामवर करिश्मा कपूरचे  माजी पती संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. मात्र तिची पोस्ट केवळ श्रद्धांजली व्यक्त करणारी नव्हे तर, संजय कपूर यांच्या निधनाचे खरे कारण देखील उघड करणारी आहे.  ज्यामध्ये तिने लिहिले - 'आणखी एक अविश्वसनीय घटना घडली आहे. संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.'


बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त काल प्रसारमध्यमांत झळकले. त्यानुसार, पोलो ग्राउंडवर संजय यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. पण त्यांच्या मृत्यूचे कारण श्वासनलिकेत मधमाशी अडकणे आहे. हा कंगना राणौतचा दावा आहे.


कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना लिहिलेली ही पोस्ट सर्वांना बुचकळ्यात पाडते आहे. 



कंगणाची पोस्ट व्हायरल


ज्यात तिने म्हंटले आहे की, संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली. पोलो ग्राउंडवर एक मधमाशी होती. जी संजय कपूर यांच्या तोंडात गेली आणि तिने संजय यांच्या गळ्याचा चावा घेतला, ज्यामुळे त्यांची श्वासनलिका बंद झाली. ते श्वास घेऊ शकत नव्हते. संजय कपूर यांनी खेळ मध्यभागी थांबवण्याची सूचना केली. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला." अशी सविस्तर माहिती कंगणाने आपल्या पोस्टद्वारे दिली आहे.


ती पुढे अशी देखील म्हणते की अशाप्रकारे मृत्यू येणं ही किती दुःखद बातमी आहे. या प्रकारच्या बातम्या ऐकून मी आता थकले आहे. "२०२५ मध्ये इतक्या विचित्र घटना घडत आहेत. की त्या आपल्या जीवनावर परिणाम करत आहेत. मी प्रार्थना करते की सर्वजण सुरक्षित राहावेत आणि देवाकडे प्रार्थना करत राहावे." असे देखील तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.  करिश्मा कपूरला संजय कपूरपासून दोन मुले आहेत, ज्यांचे नाव समायरा आणि कियान असे आहे, संजय कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांचे करिश्मा आणि त्यांच्या मुलांसोबतचे जून फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 



अहमदाबाद विमान अपघाताबाबत व्यक्त केला शोक


अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघातानंतर कंगना राणौतने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला होता. या अपघातात जीव गमावलेल्यांसाठी तिने प्रार्थना केली.

Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत