आधारकार्ड निःशुल्क अपडेट करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत होती. आता ती १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हॅन्डलवर याबाबत माहिती दिली आहे.


या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.



आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल - एक ओळखीचा पुरावा (उदा. पॅन कार्ड) आणि दुसरा पत्त्याचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र). साधारणपणे आधार केंद्रांवर या प्रक्रियेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. तथापि, यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व