उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार?

महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त


पनवेल  : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.


प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत, तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजविणाऱ्या विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत.



घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेते महत्त्वाचे चौक व रहदारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यांच्याकडून विकले जाणारे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागासह अतिक्रमण विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.


नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक परिसरात वर्दळीच्या ठिकाणी बेकायदेशीर टपरीधारकांनी महानगरपालिका कुठलाही व्यवसाय परवाना न घेता टपरीमध्ये हाॅटेल सुरू केले असून सायंकाळी फुटपाथवर उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जाते. तसेच फुटपाथवर रात्री भांडी धुऊन सर्व घाण, सांडपाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या गटारीत टाकली जाते. येथील फेरीवाल्यांचे नातेवाईक पालिकेत कामाला आहेत असे येथील ज्येष्ठ नागरिक
बोलत आहेत.


यामुळेच येथील महावितरणाच्या सबस्टेशनलगत गँस सिलिंडरचा सर्रास वापर होत असताना कारवाई होत नाही. नवीन पनवेल शहरातील सेक्टर १७ येथील वर्दळीच्या परिसरात बेकायदेशीर खाऊ गल्ल्यांवर पालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. यामुळे येथील करदाते महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग