What is a MAYDAY Call : 'मेडे' कॉल म्हणजे नेमकं काय? अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 'शेवट'चा संदेश

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक विमान दुर्घटना घडली. एयर इंडियाचे AI-१७१ हे लंडनला जात असलेले बोईंग ७८७ - ८ ड्रीमलायनर विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात पडले. पण विमान पडण्याच्या काही सेकंद आधी वैमानिकानं मेडे कॉल केला. वैमानिकानं दाखवलेल्या सतर्कतेनंतरही विमानाचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं. यात २४१ जण मृत्युमुखी पडले तर एक जण आश्चर्यकारकरीत्या वाचलाय. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत ते, मेडे कॉल म्हणजे काय आणि अशा वेळी तो किती महत्त्वाचा असतो. कारण हा शेवटचा संदेश अनेकांचा जीव वाचवणारा असतो.


?si=RPtlUMjPR2MfnrqX


१२ जून २०२५. दुपार १:३९ वाजता. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एयर इंडियाच्या फ्लाईट AI-१७१ ने टेकऑफ केलं. मात्र अवघ्या काही सेकंदातच कॅप्टन सुमित सबरवाल यांनी 'मेडे, मेडे, मेडे' असा तातडीचा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला. हा संदेश होता विमानावर कोसळणाऱ्या गंभीर संकटाचा. मेडे कॉल हा विमान आणि समुद्री क्षेत्रातील सर्वात गंभीर आपत्कालीन संदेश मानला जातो. हा शब्द फ्रेंच भाषेतील 'm'aider' म्हणजेच 'मला मदत करा' यावरून तयार झालाय. १९२० च्या दशकात लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी हा शब्द विकसित केला. १९२७ मध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओटेलिग्राफ कन्व्हेन्शननं 'मेडे'ला अधिकृतपणे मान्यता दिली. मेडे कॉल केवळ जीवघेण्या म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतच वापरला जातो. विमान इंजिनात बिघाड, अचानक बदललेलं हवामान, संरचनात्मक बिघाड, आग किंवा आपत्कालीन वैद्यकीय मदतासीठी मेडे कॉल केला जातो. अशा वेळी सलग तीन वेळा 'मेडे, मेडे, मेडे' असं वैमानिक म्हणतो. जेणेकरून कंट्रोल रुमला तो स्पष्टपणे ऐकू येईल आणि तातडीने मदत मिळू शकेल, असा उद्देश असतो.


अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टन सबरवाल यांनी मेडे कॉलद्वारे विमानाच्या गंभीर परिस्थितीची अर्थात संकटाची माहिती दिली. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या माहितीनुसार, हा कॉल प्राप्त झाल्यानंतर कंट्रोल रुमने वैमानिकाशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या काही मिनिटांत विमान मेघानीनगर परिसरात कोसळलं. विमान कोसळताच आगीचा भडका उडाला. मेडे कॉल प्राप्त होताच कंट्रोल रुमने सर्व सामान्य रेडिओ संदेश थांबवले आणि आपत्कालीन सेवांना सतर्क केलं. अहमदाबाद विमानतळावरील अग्निशमन दल, वैद्यकीय पथकं आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र २४२ प्रवाशांपैकी केवळ एकच व्यक्ती वाचली. मेडे कॉल हा पायलट आणि कंट्रोल रुम यांच्यातील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपत्कालीन सेवांना तातडीने कार्यवाही करता येते. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतीत पायलटने योग्य प्रोटोकॉल पाळला, मात्र दुर्घटनेची तीव्रता इतकी होती की वेळेत मदत पोहोचू शकली नाही.



मेडे कॉल केल्यानंतर वैमानिक विमानाचं नाव, ठिकाण, आपत्कालीन संकटाचं स्वरूप, प्रवाशांची संख्या, इंधनाची स्थिती आणि आवश्यक मदत याची माहिती देतात. या माहितीमुळे बचावकार्य किंवा मदत वेगाने करता येतं. अहमदाबाद विमान दुर्घटना नेमकी कशी झाली हे ब्लॅक बॉक्समुळे कळेलच, त्यासाठी या मेडे कॉलच्या वेळेची माहितीही उपयुक्त ठरणार आहे. कारण खोटे मेडे कॉल हा अनेक देशांमध्ये गुन्हाही मानला जातो. या भीषण विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलंय. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादला भेट दिलीय. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमित शाह यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे टाटा समूहाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत जाहीर केलीय. ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताचं सत्य बाहेर येईल, मात्र कुणी बाबा गमावले, कुणी आई गमावली, कुणी नात-नातू गमावला, कुणी पत्नी गमावलीय, कुणी पती गमावलाय, तर भाऊ गमावलाय तर कुणी बहीण....हे कधीही परतून न येणारे आहेत.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण, तीन आरोपींना पोलीस कोठडी

ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या

Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेनंतर

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई