Sim Card : मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे

दूरसंचार विभागाने केले नियमात बदल


नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रक्रियेत बदल करत ३० दिवसांत पुन्हा एकदा रूपांतरणाची परवानगी दिली आहे. पूर्वी ही मर्यादा ९० दिवसांची होती.


नव्या नियमांनुसार, कनेक्शन स्विच केल्यानंतर (म्हणजे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड) केवळ ३० दिवसांत पुन्हा एकदा स्विच करता येईल. उदाहरणार्थ, जर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये गेल्यावर ग्राहकाला तो प्लॅन आवडला नाही किंवा महाग वाटला, तर ३० दिवसांच्या आत पुन्हा प्रीपेडमध्ये येता येईल. पूर्वी यासाठी ९० दिवस थांबावे लागत होते. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही ३० दिवसांची सवलत केवळ पहिल्यांदाच मिळेल. त्यानंतर जर ग्राहकाला पुन्हा कनेक्शन बदलायचे असेल, तर पूर्वीप्रमाणेच ९० दिवसांची मर्यादा लागू होईल. म्हणजेच, ग्राहक वारंवार ३० दिवसांच्या आत बदल करू शकणार नाही.



जे ग्राहक ३० किंवा ९० दिवसांच्या मर्यादेपूर्वी आपले कनेक्शन बदलू इच्छितात, त्यांना ओटीपी प्रक्रियेचे पालन करावे लागेल. अनेकदा असे दिसून येते की, लोक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करतात, पण नंतर त्यांना प्लॅन महाग वाटू लागतो किंवा सेवेबद्दल ते समाधानी नसतात. अशावेळी पुन्हा प्रीपेडमध्ये जाण्यासाठी ९० दिवसांचा लॉक-इन कालावधी असल्याने त्यांना त्रास व्हायचा. दूरसंचार विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतील अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत