Share Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण विशेष: बाजाराची पडझड सत्राअखेर आटोक्यात! सेन्सेक्स ५७३.३८ व निफ्टी १६९.६० अंशाने घसरला !

  37

मोहित सोमण: आज सत्राची अखेर गडगडत झाली आहे.सकाळी सेन्सेक्स १००० अंशाने व निफ्टी २९१ अंशाने घसरल्याने बाजारात पडझड झाली होती. त्याची पुनरावृत्ती बाजारात अखेरच्या सत्रात कायम राहिली असली तरी शेवटी ५०० अंशाने बाजार सावरले आहे. मात्र गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स (Sensex) ५७३.३८ अंशाने घसरत ८१११८.६० पातळीवर व निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात १६९.६० अंशाने घसरण होत निफ्टी पातळी २४७१८.६० पातळीवर पोहोचला आहे.


दुसरीकडे सेन्सेक्स बँक निर्देशांकात भलीमोठी पडझड कायम राहिली असून निर्देशांकात ६०१.२० अंशाने घटला आहे. बँक निफ्टीतही मोठी पडझड कायम राहिली आहे. बँक निफ्टी ५५५.२० अंशाने घसरत अखेरीस ५५५२७.३५ पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई (BSE) मध्ये मिडकॅप (०.३२%), व स्मॉलकॅपमध्ये (०.३०%) घसरण झाली आहे.एनएसई (NSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२८%,०.६६% घसरण झाली आहे.आज अस्थिरता निर्देशांक (VIX) ने कमाल करत सत्राअखेरीस वीआयएक्स ७.५९% पातळीवर पोहोचला आहे.


आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices)मध्ये सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (०.२३%),मिडिया (०.१७%)समभागात झाली आहे ‌तर नुकसान पीएसयु बँक (१.१८%),कंज्युमर ड्युरेबल्स (०.७०%),तेल व गॅस (०.७३%), मेटल (०.९६%) समभागात झाली आहे. आज बाजारातील सोने व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात भरमसाठ वाढ झाल्याने बाजारात अस्थिरता अखेरच्या सत्रापर्यंत कायम होती.परिणामी वीआयएक्स निर्देशांक फोफावला. याशिवाय आंतरराष्ट्रीय दबाव कायम राहिल्याने सपोर्ट लेवल घटली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अमेरिकन बाजारातील कालपर्यंत महागाई दर आकडे नियंत्रित आले तरी इस्त्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पेट्रोलियमशी संबंधित असलेल्या हित संबंधांना फटका बसला आहे. त्यामुळे क्रूड दरात विक्रमी वाढ झाली आहे.याशिवाय बाजारात नफा बुकिंग (Profit Booking) झाल्याची शक्यता आहे.


अमेरिकन बाजारातील पडझडीनंतर आशियाई शेअर बाजारात त्याचा नकारात्मक परिणाम झाला. काल हल्ल्यानंतर अमेरिकन बाजारातील १ टक्क्यांहून अधिक झालेल्या पडझडीनंतर आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.९०%) सह निकेयी २२५ (Nikkei 225, ०.९०%), हेंगसेंग (०.६०%),शांघाय कंपोझिट (०.७६%) या निर्देशांकात घसरण झाली. ब्रेंट फ्युचर निर्देशांक (Brent Future Index)तर ८.८१% तर क्रूड तेल (कच्चे तेल)९.१०% वाढले.रुपयांच्या तुलनेत डॉलर च्या किंमतीत ०.५५% वाढ झाल्याने बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा रोख गुंतवणूकीकडे कल रोखला गेला. परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी पैसै काढून घेतल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारताच्या मे महिन्यातील महागाई दरात नियंत्रण राखले गेले असले तरी अजूनही आंतरराष्ट्रीय दबाव बाजारात स्पष्टपणे जाणवला. आज बीएसईतील ४१२२ समभागांपैकी १५२० समभागात वाढ झाली आहे तर २४६७ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले.एनएसईत २९६४ समभागापैकी १०५९ समभाग तेजीत राहिले तर १८२४ समभागात नुकसान झाले आहे.आज दिवसभरात शेअर्सला वृद्धीसाठी फारसा पर्याय मिळाला नाही. सेन्से क्स आज जास्तीत जास्त ८१२२८.०६ पातळीवर पोहोचला होता त्यानंतरही घसरण कायम राहिली होती.निफ्टीलाही २४७५०.२० हून अधिक आज पातळी पार करता आली नाही. शेअर बाजार सुरुवातीच्या नीचांकी पातळीवरून सावरले,परंतु तरीही शुक्रवारच्या सत्रात घसरण कायम राहिली आहे.


आज बाजारात सर्वाधिक वाढ आरएचआय मॅग्नेसिटा (०.३६%),महिंद्रा लाईफ (३.३८%),मन्नपुरम फायनान्स (३.३६%),एफडीसी (२.९८%),गार्डनरिच (२.९७%), झी एंटरटेनमेंट (२.०८%),ऑइल इंडिया (२.०९%),आयसीआयसीआय लोम बार्ड (२.०४%),भारत इलेक्ट्रॉनिक (१.७६%),ओएनजीसी (१.४६%),हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (१.४१%),टेकमहिंद्रा (०.८९%),अदानी पॉवर (०.६६%),टीसीएस (०.३३%) समभागात झाला तर नुकसान टाटा टेलिकम्युनिकेशन (६.८९%), इंडियन रिन्यूऐबल (४.७२%), रिलायन्स पॉवर (३.८३%),कॅनरा बँक (३.६१%), अजंता फार्मा (३.५२%),क्रिसील (३.४५%),सीपीसीएल (३.३८%), अदानी गॅस (२.०७%), अदानी पोर्टस (२.३५%),युनायटेड स्पिरीट (२.१५%), जिंदाल स्टील (१.९५%), जेएसबब्लू एनर्जी (१.९३%),इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (१.८५%) समभागात झाले आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि जागतिक व्यापारातील सततच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बेंचमार्क निर्देशांकांनी १३ जून रोजी सलग दुसऱ्या सत्रात त्यांची घसरण सुरू ठेवली, ज्यामुळे एकूण जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली. बाजारात व्यापक विक्री झाली,सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात संपले, तर भारत VIX ७ टक्क्यांहून अधिक वाढला, जो वाढलेली अस्थिरता आणि गुंतवणूकदारांची चिंता दर्शवितो.निफ्टी ५० ने सुरुवातीच्या व्यापारात २४,४७३ च्या इंट्राडे ट्रफवर जोरदार सुरुवात केली, आंशिक पुनर्प्राप्ती होण्यापूर्वी. तथापि,निर्देशांक अजूनही सत्राच्या शेवटी १६९.६० अंकांनी किंवा ०.६८% ने कमी होऊन २४,७१८.६० वर बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर,निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाने कमी कामगिरी केली, १.१८ टक्के घसरण झाली, त्यानंतर निफ्टी मेटल आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये तोटा झाला, जो अनुक्रमे ०.९६ टक्के आणि १.१७ टक्के घसरला. व्यापक बाजार देखील दबावाखाली राहिला, निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.५ टक्क्यांनी घसरले. याउलट,इस्रायल आणि इराणमधील वाढत्या शत्रुत्वा च्या पार्श्वभूमीवर संरक्षण समभागांमध्ये खरेदीची तीव्र उत्सुकता दिसून आली, कारण गुंतवणूकदारांना वाढत्या भू-राजकीय जोखीम आणि जागतिक सुरक्षा चिंतांमुळे संरक्षण क्षेत्रात ऑर्डर प्रवाह आणि खर्च वाढण्याची अपेक्षा होती.'


आजच्या निफ्टी हालचालीविषयी प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'साप्ताहिक चार्टवरील निफ्टीने २५,२०० च्या आसपास उच्च पातळीवर नफा बुकिंग दर्शविणारा एक मोठा बेअर कॅन्डल (Bear Candle) तयार केला जो संपूर्ण घसरणीचा ७८.६% रिट्रेसमेंट (२६,२७७-२१७४३) आहे.निर्देशांक गेल्या चार आठवड्यांच्या एकत्रीकरणाचा विस्तार २४,४००-२५,२०० च्या विस्तृत श्रेणीत होण्याची शक्यता आहे.गेल्या ४ आठवड्यांच्या श्रेणी २४,४०० च्या खालच्या बँडच्या खाली ब्रेकडाउन घसरणीच्या प्रवेगाचे संकेत देईल.वरच्या बाजूला २५,००० हा एक महत्त्वाचा अडथळा आहे, त्याच्या वर जाण्याने सध्याच्या सुधारात्मक घसरणीला विराम मिळेल. मुख्य आधार २४,५००-२४,४०० झोनवर ठेवला आहे कारण ५०-दिवसांच्या EMA आणि गेल्या चार आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या बँडचा संगम आहे.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' साप्ताहिक चार्टवरील बँक निफ्टीने ५७,००० च्या आसपास उच्च पातळीवर नफा बुकिंगचे संकेत देणारी एक मोठी बेअर कॅन्डल तयार केली.गेल्या आठवड्यात ५ पैकी ४ सत्रांमध्ये निर्देशांक लाल रंगात बंद झाला. शुक्रवारी ५५,१५० च्या नीचांकी पातळीच्या खाली एक हालचाल आणि बंद होणे येत्या सत्रांमध्ये ५४,५००-५४,००० च्या पातळीकडे आणखी घसरण उघडेल. ५० दिवसांच्या EMA आणि अलिकडच्या एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या बँडच्या संगमाच्या आसपास प्रमुख आधार दिले जातात. ५६,००० च्या वरच्या बाजूला हा एक महत्त्वाचा अडथळा आहे, फक्त त्याच्या वरचा प्रवास हा सध्याच्या सुधारात्मक घसरणीला विराम देण्याचे संकेत देईल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीचे विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'इस्त्राईल व इराण यांच्यात परत एकदा युद्धाची सुरुवात झाली आहे. कच्चा तेलाचे भाव दोन दिवसांत वाढून ७० डाॅलरचावर गेले आहेत.सोने परत एकदा एक लाखापर्यंत आले आहेत. या सर्वांचा परीणाम बाजारावर झाला आहे.व आज बाजार उघडतानाच खुप खाली आला. त्यातून आज शुक्रवार त्यामुळे मोठी पोझिशन न घेता सावध पवित्र्यात आज सर्व गुंतवणूकदार असणार शिवाय कालचा ३८०० करोड रुपयांचा विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली विक्री हाही एक निगेटिव्ह पाॅईंट आहेच.तसे ग्लोबल संकेतही बाजाराच्या दृष्टिने निगेटिव्ह आहेत. येणाऱ्या आठवडय़ात युद्ध कोणत्या दिशेने जाईल त्यानुसार बाजाराची दिशा ठरेल असे एकंदरीत चित्र आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टीट्यूशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले,'भू-राजकीय गोंधळामुळे बाजारांमध्ये तफावत दिसून आली,अस्थिरता संपली.कमकुवत जागतिक संकेतांचे प्रतिबिंब पडून, निफ्टी २४,४७३ वर तीव्र तफावतीने उघडला आणि त्याच पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला.तथापि, त्याला २४,५०० च्या मानसिक चिन्हाजवळ आधार मिळाला आणि २४,७५४ च्या उच्चांकावर पोहोचण्यासाठी तो सुधारला.जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर,संपूर्ण सत्रात निर्देशांक अस्थिर राहिला.


क्षेत्रीय आघाडीवर,मीडिया आणि आयटी शेअर्सने चांगली कामगिरी केली,ज्यामुळे व्यापक बाजाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला. याउलट सार्वजनिक क्षेत्रातील बँका,एफएमसीजी,धातू,तेल आणि वायू आणि वित्तीय सेवांमध्ये कम कुवतपणा दिसून आला -एकूणच भावना कमी झाली.जागतिक पातळीवर,मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आणि भू-राजकीय परिस्थिती वाढली, ज्यामुळे तेल पुरवठ्यात आणि प्रादेशिक स्थिरतेत संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता निर्माण झाली. डेरिव्हेटिव्ह्ज आघाडीवर,एफ अँड ओ विश्वातून, ४२ शेअर्सने वाढ केली तर १८३ शेअर्सने घसरण केली, जी व्यापक-आधारित कमकुवतपणा दर्शवते.एनसीसी,ओएफएसएस, ओएनजीसी, जुबिलंट फूडवर्क्स आणि भारत डायनॅमिक्स (बीडीएल) सारख्या समभागांमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आला -जो सक्रिय सहभाग दर्शवतो.


आजच्या सोन्याच्या चढत्या दराबाबत बोलताना अशिका ग्लोबल फॅमिली ऑफिस सर्विसेसचे सह संस्थापक अमित जैन म्हणाले की, 'इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या किमती पुन्हा १ लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत,तर आशिका ग्लोबल फॅमिली ऑफिस सर्व्हिसेसचे सह-संस्थापक अमित जैन यांच्या नेतृत्वाखालील पिवळ्या धातूचा (गोल्ड)भाव आहे. सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडणे हे विशेषतः मध्य पूर्वेतील वाढलेल्या भू-राजकीय तणावाचे प्रतिबिंब आहे.संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळात, संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सोने हे एक महत्त्वाचे साधन राहिले आहे. आपण जे पाहत आहोत ते केवळ एक धक्कादायक प्रतिक्रिया नाही - ती मध्यवर्ती बँकेच्या संचय, कमकुवत होत चाललेला फिएट आत्मविश्वास आणि दीर्घकालीन चलनवाढीच्या चिंतांमुळे चालणाऱ्या व्यापक संरचनात्मक वाढीचा ट्रेंड आहे.

Comments
Add Comment

Yellow Fertility & IVF Centre: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफची विस्तार योजना

२०३० सालापर्यंत भारतातील मोठे आयव्हीएफ नेटवर्क बनण्‍याचा संकल्‍प मुंबई: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफ या

Livpure Unione Collbration: लिव्हप्युअरची देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स होणार खुली

कंपनीचा युनिवन समुहासोबत करार  मुंबई : लिव्‍हप्‍युअर  स्मार्ट आरओ वाँटर प्युरिफायर कंपनी देशभरात १०० हून अधिक

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत थोडक्यात बचावली अकोल्याची ऐश्वर्या

अकोला: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे विमान एका वैद्यकीय

हृदयविकाराने नव्हे तर मधमाशी तोंडात गेल्याने झाला संजय कपूर यांचा मृत्यू, कंगणाने केला खुलासा

नवी दिल्ली: बॉलीवूड क्वीन आणि भाजपची खासदार कंगना राणौतने इंस्टाग्रामवर करिश्मा कपूरचे  माजी पती संजय कपूरच्या

Israel Iran War: इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने डागले तेल अवीववर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे, अनेकजण गंभीर जखमी

अमेरिकन सैन्याने इस्रायलकडे जाणारी इराणी क्षेपणास्त्रे पाडण्यास केली मदत  तेल अवीव: शुक्रवारी रात्री इराणने

एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल

चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता. संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि