Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये विमान अपघात, आतापर्यंत काय घडले ?

  61

अहमदाबाद : एअर इंडियाच्या अहमदाबाद - लंडन मार्गावर असलेल्या AI 176 विमानाला गुरुवार १२ जून रोजी दुपारी अपघात झाला. अपघातात बोईंगचे 787 - 8 ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ झाली. काही जण जखमी झाले. तपास पथकाने विमानातील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर अर्थात डीव्हीआर मिळाल्याचे सांगितले आहे.



विमानातील एक प्रवासी वाचला. सध्या या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचलेल्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या सहा पथकांनी स्थानिक अग्निशमन दलाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. विमानामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे. इमारतीची पडझड झाल्यामुळे निर्माण झालेला ढिगारा उपसून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच मृतांचे पार्थिव पंचनामा आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, एअर इंडिया कंपनीचे अधिकारी आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच जखमींची विचारपूस केली आणि मृतांच्या नातलगांचे सांत्वन केले. टाटा समुहाने जखमींच्या उपचारांचा खर्च करणार असल्याचे तसेच मृतांच्या नातलगांना एक - एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर गुरुवार १२ जूनच्या दुपारपासून आतापर्यंत विमान अपघाताशी संबंधित नेमक्या काय महत्त्वाच्या घटना घडल्या ते थोडक्यात जाणून घेऊ...



डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर : तपास पथकाने विमानातील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर अर्थात डीव्हीआर मिळाल्याचे सांगितले.



अहमदाबाद पोलिसांनी दिलेली माहिती : विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील २४ नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ झाली.



एक प्रवासी वाचला : विमानातील २४२ जणांपैकी 11A आसनावर बसलेला रमेश विश्वासकुमार नावाचा प्रवासी वाचला. हा प्रवासी किरकोळ जखमी आहे. सध्या या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचलेल्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे.



टाटा समुहाचे प्रसिद्धीपत्रक : आम्हाला जे दुःख होत आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा ग्रुप १ कोटी रुपयांची मदत करेल. जखमींचा वैद्यकीय खर्चही आम्ही करू. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करू. बी. जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू. या अकल्पनीय काळात आम्ही बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत उभे राहण्यास दृढ आहोत. - एन चंद्रशेखरन अध्यक्ष, टाटा सन्स



एअर इंडियाचे प्रसिद्धीपत्रक : अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या AI 171 विमानाला गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी अपघात झाला. तब्बल १२ वर्षे जुने बोईंग ७८७-८ विमान अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघाले होते, त्यात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. आम्हाला कळवताना दुःख होते की, २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकमेव वाचलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि १ कॅनेडियन नागरिक आहे. वाचलेली व्यक्ती भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे.



 

 
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे