मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई  : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्स्प्रेस धावते.


छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत नवी वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार आहे.
क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या पंधरा दिवसांत मुंबईपर्यंत वंदे भारत रेल्वे धावणार आहे. दरम्यान, मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त ७ तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरातील प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांनी कमी
होणार आहे.

Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ