Sumit Sabharwal : कॅप्टन सुमित सभरवालचा बाबांना अखेरचा कॉल, निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा अपूर्ण

  305

८८ वर्षीय वडिलांवर दुःखाचा डोंगर



अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (१२ जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या २४ जणांचा मृत्यू झाला. यावेळी विमानात १० केबिन क्रू मेंबर्ससह एकण २४२ प्रवासी होते. अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला.




मोठं संकट


अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विमान शहरातील कमी लोकवस्तीच्या भागात पडले. याउलट दाट लोकवस्तीत पडले असते तर मृतांचा आकडा एकदम वाढला असता, असे तज्ज्ञ सांगत आहेत. अनियंत्रित होत असलेले विमान दाट लोकवस्ती ऐवजी विरळ लोकवस्तीच्या भागात पडावे यासाठी मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांनी प्रयत्न केले. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. विमानातील यंत्रणां बंद पडल्या आणि उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमान पडले. मिळालेल्या मर्यादीत वेळेत विमान शक्य तेवढे वळवून कमीत कमी वस्ती असलेल्या भागाकडे नेण्याची खबरदारी घेऊन मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले. या प्रयत्नात त्यांनी प्राण गमावले. पण तज्ज्ञ सबरवाल यांनी घेतलेल्या खबरदारीसाठी त्यांचे कौतुक करत आहेत.



वडिलांना मोठा धक्का


पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमीत सभरवाल राहत होते. सुमीत सभरवाल यांचे ८८ वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले आहेत. विमान उड्डाण करायला तासभर असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता. लंडनला पोहोचल्यावर फोन करतो, तोवर काळजी घ्या असेही सांगितले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही आठवण सांगितली. सुमीत सभरवाल यांच्या गाठीशी ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या आईचे २ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुमीत यांच्यावर होती. सभरवाल अविवाहित होते. अशी माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली.



अन्य क्रू मेंबरमध्ये कोण?


या अपघातात क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. त्या गेली १० वर्षे हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होत्या. अपर्णा महाडिक या ४० वर्षांच्या होत्या. त्यांना ९ वर्षांची मुलगी आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या त्या पत्नी होत्या. महाडिक यांचे पती एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत. त्या गोरेगाव येथे राहायच्या. त्यांना एक मुलगी आहे. तर विमानाचे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर बोरिवलीमध्ये राहायचे. ते अभिनेता विक्रांत मॅस्सीचे भाऊ होते.

Comments
Add Comment

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.

स्मृति इराणी म्हणतात, ‘भारतातला प्रत्येक मुलगा-मुलगी होणार क्रिएटर’

नवी दिल्ली : "भारतीय रचनात्मकतेची क्रांती आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती शाळेच्या वर्गातून