राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की , ज्या पद्धतीप्रमाणे विमान अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा नवीन सदस्य जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू त्याच्यापासून महायुतीला चांगलाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की याचा आम्हाला आनंदच आहे. असे स्पष्ट करत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा गट म्हणून नाहीतर पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे आता गट हा समोरच्या बाजूला उरला आहे असे सांगून आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत भाजपाने काय नारा दिला आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही तर महायुतीचे सदस्य म्हणून एकत्रित निवडणूक लढवू.

नाशिकमध्ये राजुर बहुला येथे 25 एकर जागेमध्ये आयटी पार्क होणार आहे त्यासाठीची जागा ही निश्चित करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे तर महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या 15 एकर जागेच्या संदर्भामध्ये देखील आम्ही लवकरच तेथील आयटी पार्कच्या कामाला देखील सुरुवात करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की नाशिक मध्ये लवकरच एक मोठी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या नावासंदर्भात त्यांनी कोणतीही घोषणा करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून लवकर कंपनीचे बैठक होऊन नाशिकच्या योजनेची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करत

सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा कदापि दर्या खोऱ्यातील जागा घेणार नाही कारण त्या जागेचा आम्हाला काही उपयोग होणार नाही आमची ही स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन