शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची पाहणी

आयुक्त सौरभ राव यांनी यंत्रणांना दिले सतर्क राहण्याचे निर्देश


ठाणे  : पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरुन पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.


या पाहणीदौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे, शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते. यावेळी विटावा सबवे, पेढया मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. विटावा सबवे येथे ४० एचपीचे पंप बसविण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी केले या ठिकाणी २४ तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.


पेढया मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी पंप बसविण्यात आले असून क्रॉस कलव्हर्टची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी २४ तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो. या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी आयुक्तांनी केली.


अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क रहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या. पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. महापालिका हद्दीतील ३०० कि.मी नाल्याची सफाई करण्यात आली आहे. मशीनच्या साह्याने ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेने हाती घेतला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ३४ सखल भाग असून त्यापैकी १४ सखल भागात थोड्याशा पावसात पाणी साचते यासाठी एकूण ६४ पंपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट