Ahmedabad Plane Crash : मृतांच्या कुटुंबांना अशी मिळणार नुकसानभरपाई वैयक्तिक विमा का महत्त्वाचा जाणून घ्या.....

प्रतिनिधी: गुरूवारी दुपारी १.३० सुमारास अहमदाबाद विमान अपघातासारखी मोठी घटना घडली.ज्यामध्ये २४२ हून अधिक प्रवासी नागरिक मृत्युमुखी पडले.या दुर्घटनेत अनेकांची जिवीतहानी झाली आहे तसेच वित्तहानी झाली आहे.त्यामुळे एअर इंडियाची पालक टाटा सन्सने मृत परिवारांना एक कोटींची मदत जाहीर केली होती. मात्र गेलेल्या जीवांची भरपाई करणे कठीण असते.अशा वेळी विमा किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. यासाठीच मिळालेल्या माहितीनुसार,न्यू इंडिया इन्शुरन्स, टाटा एआयजी या कंपन्या विम्याची जबाबदारी घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.


एअर इंडियाला या अपघातानंतर २० अब्ज डॉलरपर्यंत विमा (Insurance) मिळू शकतो. यापूर्वी संपूर्ण एयर इंडियाने आपल्या विस्तारा कंपनीसह ३०० विमानांचा विमा काढला होता. त्याचा प्रिमियम कंपनीने २०२४ पर्यंत भरला होता.त्याच धर्तीवर कंपनीला आता कव्हर मिळू शकतो. बोईंग ७८७-८ ड्रिमलाईनर या विमानाचा काल अहमदाबाद येथे अपघात झाला होता ‌.


एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान लंडन गॅटविकला रवाना झाल्यानंतर काही वेळातच पश्चिम भारतातील अहमदाबाद येथील एका निवासी भागातील मेडिकल कॉलेज वसतीगृहावर हे विमान कोसळले. या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.


अशा घटनांमुळे पिडित व त्यांच्या कुटुंबीयांंचे मोठे नुकसान होते अशातच आर्थिक जोखीम व आर्थिक गुंतवणूकीबाबत माहिती असणे उपयोगी ठरते.माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, या नुकसानभरपाईचा खर्च एका कंपनीला शक्य नाही तर तो काही कंपन्या मिळून करू शकतात. तज्ञांनी नोंदवलेल्या माहितीनुसार, या प्रवाशी कुटुंबांना नुकसानभरपाई देतानाच अनेक अटी शर्ती लागू असतात. तांत्रिकदृष्ट्या त्या संबंधित पिडिताचा देश, वय, कारण अशा अनेक क्लिष्ट गोष्टींचा समावेश असतो. त्याची पडताळणी झाल्यावर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना व पिडितांना नुकसान भरपाई मिळेल असे सांगण्यात येत आहे.


अशाच धर्तीवर हे नुकसान पुनर्विमा कंपन्यांशीही संबंधित आहे. तज्ञांच्या मते २०० ते ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत ही नुकसानभरपाई होऊ शकते.


रिइश्युरर (पुनर्विमा) कंपनीला किती असते मार्जिन?


या कंपन्या १.५ ते २ % मार्जिन एकूण रक्कमेवर आकारते असे तज्ञांनी म्हटले आहे. ही जोखीम अनेक कंपन्या एकत्र येऊन भरपाई देतात.त्यातील प्रमुख पुनर्विमा कंपन्या १० ते १५ टक्के हिश्याचे व्यवस्थापन करते. सामान्यतः,व्यावसायिक विमान कंपन्या व्यापक विमान विम्यात गुंतवणूक करतात, ज्यामध्ये सामान्यतः हल विमा, प्रवासी दायित्व, तृतीय-पक्ष कायदेशीर दायित्व (Third Party Legal Liability) मालवाहू दायित्व आणि क्रू वैयक्तिक अपघात कव्हर समाविष्ट असते असे तज्ञांचे मत आहे.


भरपाईचे मुल्यांकन सुरू!


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नुकसानीचे मूल्यांकन विमा कंपन्यानी सुरू केले असून पुनर्विमा कंपन्या या भरपाईसाठी मोठमोठ्या दाव्यासाठी तयारी करत आहे. यामुळे जागतिक कारणांमुळे दबावात असलेल्या विमा क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या अधिक संकटाचा सामना करावा लागेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणात मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास, भारत कार्यरत विमान कंपन्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन १९९९ कराराला बांधील आहे. हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्यावर भारत स्वाक्षरी करणारा आहे.


पण प्रश्न उपस्थित राहतो की स्वतः चा विमा किती आवश्यक आहे.स्वतः चा वैयक्तिक विमादेखील किती महत्वाचा आहे याचे उदाहरण विमान अपघात आहे. कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल परंतु व्यक्तिशः विमा काढणे महत्वाचे आहे.


काय असतो विमान अपघात संरक्षण विमा -


१) या विम्यात विमान कंपन्या झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसानभरपाई देतात.
२) या विम्यात विमान प्रवासात झालेल्या दुखापती,सर्जरी,देखभाल,स्वास्थ देखभाल या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो.
३) अपंगत्व आल्यासही त्याची सुरक्षा विम्यात अंतर्भूत असतो


विमान कंपनीकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईशिवाय वैयक्तिक प्रवास विमा असल्यास त्याचा आणखी दिलासा मिळतो.  या विम्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणात मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास किंवा आणखी इस्पितळात भरती करताना त्यासंबंधी इतर खर्चात यावेळी हा अतिरिक्त विमा कामी येतो. या नुकसानभरपाई व्यतिरिक्त खाजगी विम्यात १० ते ५० रुपयांपासून पुढे ५०० रूपये प्रति दिन याप्रमाणे घेता येतो. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन