दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून, भीत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.


संबंधित पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर युद्धपातळीवर पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये स्थानिक कामगार आणि संरक्षण तज्ज्ञांचा सहभाग असून, कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर एक जनआक्रोश कल्याणात उभा राहिला. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली. आर्किटेक्चरनी या पडलेल्या भिंतीचा आढावा घेऊन अशा कामांमध्ये लाईम काँक्रिटीकरण केले जाईल असे सांगितले.


पावसाळा सुरू असल्यामुळे कामात थोडी दिरंगाई होईल; परंतु काम थांबणार नाही, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आता पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते कडकडून जागे होऊन कामाला लागले आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या कामात पुन्हा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे देखील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यातदेखील सुरू राहणार असून पावसाचा जोर जास्त असल्यास संरक्षण भिंतीच्या काम मंदावण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच संरक्षण भितीचे काम करण्यात येणार असल्याचे मत वास्तुविशारद सपना लाखे यांनी
व्यक्त केले.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील