Bollywood: करिश्मा कपूरवर कोसळला दु:खाचा डोंगर, करीना-सैफ आले भेटायला

मुंबई: बिझनेसमन आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे गुरूवारी रात्री इंग्लंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. या धक्कादायक बातमीनंतर करिश्माची बहीण करीना कपूर, सैफ अली खान आणि जवळची मैत्रीण मलायका अरोरा रात्री उशिरा करिश्माच्या घरी पोहोचले आणि तिचे सांत्वन केले.



करीना आणि सैफ करिश्माच्या घरी


संजय कपूर यांच्या निधनाची बातमी मिळताच करीना कपूर आपला पती सैफ अली खानसोबत गुरूवारी रात्री उशिरा करिश्माच्या मुंबई येथील घरी गेले. करीना आणि सैफ यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होते. दरम्यान, करिश्मा कपूरने अद्याप एक्स पतीच्या निधनाबाबत कोणतेही विधान केलेले नाही.



मलायका आणि अमृताही करिश्माच्या घरी गेले


यातच मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोघीही करिश्माच्या घरी दिसल्या. अमृताचे पती शकील लदाकही तिच्यासोबत होते.



संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


मिडिया रिपोर्टनुसार, पोलो खेळताना संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीला सुहेल सेठ यांनी दुजोरा दिला



२०१६मध्ये झाला होता करिश्मा-संजय कपूर यांचा घटस्फोट


संजय आणि करिश्मा यांनी २००३मध्ये लग्न केले होते. त्यानंतर २०१६मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करिश्मा २०१०मध्ये दिल्ली येथून आपल्या घरी मुंबईला आली होते. येथे तिचा मुलगा कियानचा जन्म झाला. २०१४मध्ये दोघांनी आपले नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी